महाराष्ट्राला पुन्हा नवे राज्यपाल मिळणार? रमेश बैस यांची राज्यपालपदातून लवकरच सुटका होण्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 07:11 AM2023-04-14T07:11:01+5:302023-04-14T07:11:17+5:30
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस छत्तीसगडमध्ये वर्षाअखेर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा होऊ शकतात.
सुनील चावके
नवी दिल्ली :
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश होऊ विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा होऊ शकतात. तेथील भाजपच्या नेतृत्वाचा अभाव यांच्यासाठी अनुकूल ठरण्याची चिन्हे असून, राजकारणात सक्रिय करण्याविषयी गंभीरपणे विचार करीत असल्याचे समजते.
लोकसभेत रायपूर मतदारसंघाचे सातवेळा प्रतिनिधित्व केलेले रमेश बैस यांच्यासह छत्तीसगड भाजपच्या सर्वच खासदारांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे उमेदवारी नाकारण्यात आली होती.
सक्रिय राजकारणातून भाजपश्रेष्ठींनी दिलेली निवृत्ती शिरोधार्ह मानून बैस यांनी जुलै २०१९ मध्ये दिलेली राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारली. बैस यांनी कोणतेही वाद निर्माण न करता त्रिपुरा, झारखंड आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा अतिशय संयमाने सांभाळली आहे.
छत्तीसगड भाजपमध्ये नेतृत्वाची पोकळी
माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांच्या नेतृत्वाला विराम मिळाल्यानंतर गेल्या पाच वर्षापासून छत्तीसगड भाजपमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. राज्यात सत्ताधारी कॉंग्रेसचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह बघेल यांना आव्हान देऊ शकणारे नेतृत्व भाजपपाशी नाही. त्यामुळे रमेश बैस यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय करण्याविषयी भाजप श्रेष्ठी गंभीरपणे विचार करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास चालू वर्षाअखेर मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांसोबत छत्तीसगडमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बैस यांची लवकरच राज्यपालपदाच्या सोनेरी पिंजयातून सुटका होण्याची शक्यता आहे.
राज्यात दांडगा संपर्क
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या काही महिन्यांत भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ७५ वर्षी कधीही पुनरागमन होऊ शकते. रमण सिंह यांच्याप्रमाणेच क्षत्रिय समाजाचे बेंस वर्षापासून राज्यपाल असले तरी त्यांचा छत्तीसगडमधील संपर्क दांडगा आणि छत्तीसगडमध्ये सर्वव्यापी आहे. सौम्य आणि मनमिळाऊ स्वभावाचे बैस यांची राज्यातील वर्षाअखेर लोकप्रिय आणि सर्वमान्य भाजप नेत्यांमध्ये गणना होते. विशेष म्हणजे बेंस यांच्यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपालपद भूषवित असताना उत्तराखंडच्या घातलेल्या मुख्यमंत्रिपदाचा ध्यास लागलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना जंगजंग पछाडूनही सक्रिय राजकारणात परतणे शक्य झाले नाही. मात्र, मुंबईच्या राजभवनात दोन महिन्यांपूर्वी दाखल झालेले बैस याबाबतीत नशीबवान ठरू शकतात.