Navneet Rana: नवनीत राणा बोलून फसल्या, जामीन रद्द होणार? कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन, सरकारी वकील दाद मागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 06:37 AM2022-05-09T06:37:27+5:302022-05-09T06:39:19+5:30

Navneet Rana: हनुमान चालिसा वाचणे जर गुन्हा असेल तर मी १४ वर्षे शिक्षा भोगण्यास तयार आहे. तरी देखील मी पुन्हा उभी राहीन. उद्धव ठाकरेंना माझे आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधात कुठेही निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकून दाखवावे, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंना दिले आहे. 

Will Navneet Rana's bail be canceled? Violation of court order, public prosecutor Pradeep Gharat will appeal today | Navneet Rana: नवनीत राणा बोलून फसल्या, जामीन रद्द होणार? कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन, सरकारी वकील दाद मागणार

Navneet Rana: नवनीत राणा बोलून फसल्या, जामीन रद्द होणार? कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन, सरकारी वकील दाद मागणार

googlenewsNext

खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला होता. पुन्हा अशाप्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेला वेठीस धरू नये, पोलिसांना तपासात सहकार्य करावे आणि पुराव्यांशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये. तसेच माध्यमांना प्रतिक्रिया किंवा मुलाखती देऊ नये अशा अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हनुमान चालिसावरून वक्तव्ये केली आहेत. यामुळे त्यांचा जामीन रद्द होण्याची शक्यता आहे. 

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी नवनीत राणा यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा केला आहे. याविरोधात सोमवारी न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

लिलावतीमधून डिस्चार्ज मिळताच नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे. हनुमान चालिसा वाचणे जर गुन्हा असेल तर मी १४ वर्षे शिक्षा भोगण्यास तयार आहे. तरी देखील मी पुन्हा उभी राहीन. यापुढे माझा लढा सुरुच राहणार आहे. उद्धव ठाकरेंना माझे आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधात कुठेही निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकून दाखवावे, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंना दिले आहे. 

मी कोणता गुन्हा केला ज्याची मला शिक्षा मिळाली. क्रूर बुद्धीने महिलेवर, लोकप्रतिनिधीवर कारवाई करण्यात आली.  माझ्यावर जो अन्याय झाला, तुरुंगात ते पोलीस ठाण्यात त्यावर मी लवकरच बोलणार आहे. एवढा अत्याचार केला, तुमच्याकडे ताकद आहे म्हणून. लोकांसमोर येऊन तुम्ही निवडणूक लढवून दाखवा. महिलेची ताकद काय आहे हे मी दाखवून देईन. महाराष्ट्राची जनता माझ्यावर झालेल्या अत्याचाराचे उत्तर देईल. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मी पूर्ण ताकदीने लढा देणार आहे, असे शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे. 

रामभक्तांचा मुंबईत प्रचार करणार
मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईत दोन पिढ्यांपासून सत्ता आहे त्यांच्याविरोधात मी येत्या महापालिका निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहे. मुंबईत जे रामभक्त आहेत त्यांच्या प्रचारासाठी मी उभी राहणार आहे. माझे घर जरी पाडले तरी रस्त्यावर राहून प्रचार करेन, असेही नवनीत राणा यांनी म्हटले आहे. 

Web Title: Will Navneet Rana's bail be canceled? Violation of court order, public prosecutor Pradeep Gharat will appeal today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.