एमसीव्हीसीचा अभ्यासक्रम बंद करणार नाही - निलंगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 04:33 AM2018-05-12T04:33:34+5:302018-05-12T04:33:34+5:30

एमसीव्हीसी अभ्यासक्रम बदलणार, आयटीआयमध्ये रुपांतरण होणार अशा सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम देत राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी

Will not close the course of MCVC - Nilangekar | एमसीव्हीसीचा अभ्यासक्रम बंद करणार नाही - निलंगेकर

एमसीव्हीसीचा अभ्यासक्रम बंद करणार नाही - निलंगेकर

googlenewsNext

भालचंद्र येडवे
लातूर : एमसीव्हीसी अभ्यासक्रम बदलणार, आयटीआयमध्ये रुपांतरण होणार अशा सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम देत राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी एमसीव्हीसी अभ्यासक्रम रोजगाराभिमुख असून, त्याच्या बदलाचा वा रुपांतरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट, अभ्यासक्रमाच्या बळकटीसाठी उच्चस्तरीय समिती गठित करणार असल्याचे सांगितले.
निलंगेकर म्हणाले, महाराष्ट्रात या अभ्यासक्रमाची परिस्थिती चांगली असून, इ.स. २०१७ मध्ये या अभ्यासक्रमासाठी एकूण प्रवेश क्षमता असलेल्या ७६ हजार १८६ पैकी ५८ हजार ८८० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. प्रवेश क्षमतेच्या तुलनेत परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ७७.२८ इतकी आहे. नुकताच या अभ्यासक्रमात कालानुरुप बदल करीत ३० अभ्यासक्रमाचे २० मध्ये रुपांतर करण्यात आले आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून रोजगारक्षम अभ्यासक्रम बनविण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, या अभ्यासक्रमाला नवसंजीवनी देण्यासाठी शासनस्तरावर वेगवेगळ्या बैठका घेऊन नियोजन करणे सुरू असताना काही वर्तमानपत्रांतून या अभ्यासक्रमाच्या बाबत उलटसुलट बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या संदर्भात कौशल्य विकास व उद्योजक कार्यालयाने म्हटले आहे, सदर बातम्यांमध्ये कसलेही तथ्य नसून, कोणतेही अभ्यासक्रम बंद होणार नाहीत. शिवाय, हे सर्व अभ्यासक्रम पूर्ववत चालू राहतील, असेही पाटील म्हणाले.
दर्जा वाढविण्याबाबत चाचपणी
एमसीव्हीसीच्या अभ्यासक्रमाचा दर्जा वाढविण्यासाठी चाचपणी सुरू असून, या संदर्भात शासनस्तरावर बैठका घेण्याचे सत्र सुरू आहे. महाराष्ट्रात या अभ्यासक्रमाची परिस्थिती चांगली असून, अनेकजण स्वत:चा व्यवसाय करतात. बहुतांश विद्यार्थी हे उद्योजक झाले असल्याने या अभ्यासक्रमावर कसलेही गंडांतर येणार नाही, असेही संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Will not close the course of MCVC - Nilangekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.