पुण्यासाठीचे पाणी सोडू देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
By admin | Published: April 29, 2016 02:22 AM2016-04-29T02:22:15+5:302016-04-29T02:22:15+5:30
पोलीस बंदोबस्तामध्ये शहराच्या वाट्याचे पाणी दौंडला सोडण्याची भाषा पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून वापरली जात आहे.
पुणे : पोलीस बंदोबस्तामध्ये शहराच्या वाट्याचे पाणी दौंडला सोडण्याची भाषा पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून वापरली जात आहे. त्यांनी पोलीस फोर्स किंवा लष्कर जरी आणले तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धरणाच्या बाजूने साखळी उभी करून पाणी पळवू देणार नाही. त्यांनी गोळ्या घातल्या तरी चालतील; पण पाणी सोडू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते बंडू केमसे यांनी गुरुवारी दिला.
दौंडला पाणी सोडण्यावरून महापालिकेमध्ये पक्षनेत्यांची तातडीने बैठक झाली. यामध्ये पुण्याच्या वाट्याचे पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये दौंडला सोडले जाऊ नये, अशी भूमिका पक्षनेत्यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना बंडू केमसे यांनी सांगितले, ‘‘पालकमंत्र्यांकडून १.५ टीएमसी पाणी दौंडला देण्याचा निर्णय बळजबरीने
घेतला जात आहे. दौंडला ९० दिवसांचे पाणी सोडले जाते; मात्र प्रत्यक्षात ते
७० दिवसांमध्येच संपते. त्यामुळे
२० दिवसांचे पाणी जाते कुठे, याचे उत्तर पालकमंत्र्यांनी द्यावे.’’
शहरामध्ये स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.