तिस-या आघाडीसोबत जाणार नाही - बच्चू कडू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 08:06 PM2018-04-06T20:06:00+5:302018-04-06T20:15:46+5:30

देशात तिसरी आघाडी स्थापन होत आहे. पण या आघाडीसोबत मी जाणार नाही. कारण तिसरी आघाडी तयारी केली म्हणजे झाली नाही. तर त्याच्यासाठी विचार असला पाहिजे, मुद्दे असले पाहिजेत. अन्यथा तिसरी आघाडी सत्तेसाठी असू नये. सर्वांना बरोबर घेऊन जाणारी असावी, या मताचा मी आहे.

Will not go with the Third Front - Bachu Kudu | तिस-या आघाडीसोबत जाणार नाही - बच्चू कडू 

तिस-या आघाडीसोबत जाणार नाही - बच्चू कडू 

Next
ठळक मुद्देतिस-या आघाडीसोबत जाणार नाही‘आमदारांची रावटी’ कार्यक्रम राबविणारपूर्वी जातीभेद होता, आता गावभेद निर्माण होतोय

- अनंत जाधव

सावंतवाडी : देशात तिसरी आघाडी स्थापन होत आहे. पण या आघाडीसोबत मी जाणार नाही. कारण तिसरी आघाडी तयारी केली म्हणजे झाली नाही. तर त्याच्यासाठी विचार असला पाहिजे, मुद्दे असले पाहिजेत. अन्यथा तिसरी आघाडी सत्तेसाठी असू नये. सर्वांना बरोबर घेऊन जाणारी असावी, या मताचा मी आहे. त्यामुळे मुद्दे पटत नसल्यामुळे आपण स्वतंत्रपणे लढणार आहे. यासाठी कोणाची मदत घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे मत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
आमदार कडू हे एका कार्यक्रमासाठी कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे जात असताना सावंतवाडी येथे ‘लोकमत’शी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत रूपेश जाधव, समीर आचरेकर, अजय जाधव, प्रसाद मुळे, रोहन नलावडे आदी उपस्थित होते.
शासन कोणाची मागणी नसताना गावात वेगवेगळ््या सोळा योजना राबवित आहे. यात तंटामुक्त, आदर्श, यशवंत ग्राम, हागणदारी मुक्त, श्रमदान अशा या योजना आहेत. या योजना सरकारकडे कोणी मागितल्या होत्या का? मग का सरकार राबवते? सरकारने या सर्व योजना बंद करून एकच योजना राबवावी, ती म्हणजे ‘उद्योगग्राम गाव योजना’. यातून शेतकºयाची आर्थिक समृध्दी होईल. त्यांच्या पिकाला भाव मिळेल, छोटे-छोटे उद्योग उभे राहतील. त्याने गावाची आर्थिक उन्नती होईल. यातून गाव सुखी होईल. मग गावात भांडणे होणार नाहीत. प्रत्येकाच्या घरी शौचालये येतील. यातून आदर्श गावाची निर्मिती होईल. शौचालये आली की हागणदारी मुक्त गाव होण्यास मदत होईल. या सर्व योजना आर्थिक स्थैर्यावर अवलंबून आहेत.
त्यामुळे गाव व शहरातील आर्थिक दरी वाढवण्यिापेक्षा प्रत्यक्ष त्यांच्या हाताला काम द्या. त्यामुळे गावातील गावभेद दूर होईल, असे मत त्यांनी यावेळी मांडले. आता सध्या गावात घरकुलासाठी दीड लाख, तर शहरात घरकुलसाठी अडीच लाख दिले जातात. मग ही आर्थिक दरी नाही का, असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पूर्वी जातीभेद होता, आता गावभेद निर्माण होतोय
ज्या योजना गावाने मागितल्या नाहीत त्यावर सरकार कोट्यवधी रूपये खर्च करते, पण ज्या सामान्य माणसाला, शेतकरी वर्गाला हव्या त्या योजना गावात राबविल्या जात नाहीत. त्यामुळेच गावात पूर्वी जातीभेद होता आता गावभेद निर्माण होऊ लागला आहे. गाव आणि शहरातील दरी रूंदावत चालली आहे. हे सर्व वेळीच दूर करा आणि गावात ‘उद्योगग्राम’सारख्या योजना आणा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली 

‘आमदारांची रावटी’ कार्यक्रम राबविणार
मी अंध अपंगासाठी काम करतो, पण सिंधुदुर्गमध्ये आल्यावर अनेक प्रश्न बघितले की या लोकांसाठी कधी कोणी आवाजच उठवला नसल्याचे लक्षात येते. त्यामुळे मी भविष्यात ‘आमदारांची रावटी’ असा कार्यक्रम सावंतवाडीतून सुरू करणार आहे. यातून अंध-अपंगांचे प्रश्न प्रत्यक्ष गावात जाऊन सुटले पाहिजे यासाठी झटणार आहे. आॅगस्ट किंवा सप्टेंबरला हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, हळूहळू तो संपूर्ण कोकणात राबविण्यात येईल, अशी माहितीही आमदार कडू यांनी दिली. वास्तविक पाहता येथील लोकप्रतिनिधींनी अपंगाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पण ते लक्ष देताना दिसत नाहीत. शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या म्हणजे काम झाले असे समजू नये, तर प्रत्यक्ष या लोकांना लाभ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: Will not go with the Third Front - Bachu Kudu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.