मित्रपक्षावर विसंबून राहणार नाही

By admin | Published: January 29, 2015 03:29 AM2015-01-29T03:29:10+5:302015-01-29T03:29:10+5:30

आम्ही ज्या पक्षाशी युती करतो त्या पक्षाची ताकद वाढते आणि त्यांचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतात. मात्र आमचे उमेदवार निवडून येत नाहीत

Will not rely on friends | मित्रपक्षावर विसंबून राहणार नाही

मित्रपक्षावर विसंबून राहणार नाही

Next

पंढरपूर : आम्ही ज्या पक्षाशी युती करतो त्या पक्षाची ताकद वाढते आणि त्यांचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतात. मात्र आमचे उमेदवार निवडून येत नाहीत. त्यामुळे यापुढे मित्रपक्षावर विसंबून न राहता आमच्या उमेदवाराची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करावा लागेल. यादृष्टीने १५ मार्च रोजी मुंबईत रिपब्लिकन पार्टीचे अधिवेशन घेणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी बुधवारी सांगितले.
महायुतीतून आम्ही आठ जागा लढविल्या होत्या. त्या-त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. ज्या जागा आम्ही जिंकू शकतो, त्या मित्रपक्षाकडून मिळत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. निवडणुकीच्या काळात काँग्रेसमधील अनेक प्रमुख नेते आमच्या संपर्कात होत, असा दावाही त्यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला राज्यात मंत्रीपद घेण्याचा आग्रह धरला आहे. परंतु मोदी यांनी मला केंद्रीय मंत्रीपद देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे मी राज्यातील मंत्रीपद स्वीकारले नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Will not rely on friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.