पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही- सतीशचंद्र माथुर

By Admin | Published: September 4, 2016 08:19 PM2016-09-04T20:19:07+5:302016-09-04T20:19:07+5:30

गेल्या काही दिवसापासून पोलिसांवरील हल्ले वाढले आहे.

Will not tolerate attacks on the police - Satish Chandra Mathur | पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही- सतीशचंद्र माथुर

पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही- सतीशचंद्र माथुर

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 4 - गेल्या काही दिवसापासून पोलिसांवरील हल्ले वाढले आहे. पोलिसांवरील हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही, असा इशारा राज्याचे पोलीस महासंचालक सतिशचंद्र माथूर यांनी शनिवारी येथे दिला.
गणेशोत्सव, बकरी ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पोलीस महासंचालक शनिवारी औरंगाबादेत आले होते. पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. औरंगाबाद परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजीत पाटील, नांदेड परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद , शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. वरळी येथील वाहतूक शाखेचे कर्मचारी विलास शिंदे यांचा दुचाकीस्वारांच्या मारहाणीत मृत्यू झाला. यासोबत राज्यात ठिक,ठिकाणी पोलिसांवरील हल्ले होतच आहे. सरकारवरील रोषातून हे हल्ले होत आहे, का असा प्रश्न माथूर यांना विचारला असता ते म्हणाले की, पोलिसांवरील हल्ले वाढले हे खरे आहे, मात्र सरकारवरील रोष म्हणून हे हल्ले होत नाही. तर व्यक्तीगत आणि तत्कालीन कारणातून या घटना झालेल्या आहेत. मात्र पोलिसांवरील हल्ले आम्ही खपवून घेणार नाही. हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
दोन दिवसानंतर सुरू होणारा गणेशोत्सव अत्यंत शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी मराठवाड्यातील पोलिसांनी केलेल्या तयारीची माहिती पोलीस अधीक्षकांनी आज दिली आहे. जनता हेच पोलिसांचे कान आणि डोळे असतात. जनतेच्या सहकार्यानचे पोलिस काम करीत असतात. त्यामुळे जनतेशी समन्वय ठेवून काम करावे, असा निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचे ते म्हणाले. एटीएसने इसिस संबंधी तरुणांवर केलेल्या कारवाई संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलेल्या टिपणीबाबत आपले मत काय, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, एटीएस असो अथवा अन्य कोणतेही पोलीस गुन्हेगारांना अटक करुन न्यायालयासमोर हजर करीत असते. त्यावेळी आरोपींनाही आपले म्हणने मांडण्याची संधी न्यायालय देत असते. एटीएसने पकडलेल्या आरोपींकडे बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आढळले आणि ते बॉम्ब तयार करण्याच्या तयारीत असताना त्यांच्यावर कारवाई झाली. राजकीय व्यक्त ींच्या टिकेवर मी कोणतीही भाष्य करणार नसल्याचे ते म्हणाले. पोलिसांची निवासस्थाने आणि पोलीस ठाणे, प्रशासकीय इमारतीचा प्रश्न सोडविण्यासाठी पोलिस विभागाचे स्वतंत्र गृहनिर्माण मंडळ आहे. यांतर्गत औरंगाबाद शहरात पोलिसांसाठी ५०० घरे आणि पोलिस आयुक्तालयाची स्वतंत्र इमारत उभारण्यात येत आहे.

फौजदारांच्या नियुक्तीचा प्रश्न सोडविणार

पोलिस दलात फौजदारांच्या एकूण जागांपैकी २५टक्के पदे ही खात्यांतर्गत जमादारांना बढती देऊन भरण्यात येतात. २०१३मध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेले शेकडो जमादारांना आजही फौजदारपदी नियुक्ती दिली जात नसल्याकडे महासंचालकांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, सेवा ज्येष्ठतेनुसार जमादारांना नियुक्ती दिली जाते. न्यायालयात याविषयी याचिका प्रलंबित आहेत. त्याबाबत पाठपुरावा करून हा प्रश्न निकाली काढण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

Web Title: Will not tolerate attacks on the police - Satish Chandra Mathur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.