यापुढे पाक कलाकारांसोबत काम करणार नाही - बॉलिवूडचा नरमाईचा पवित्रा

By admin | Published: October 22, 2016 10:21 AM2016-10-22T10:21:19+5:302016-10-22T10:47:26+5:30

यापुढे कोणत्याही पाकिस्तानी कलाकारासोबत काम करणार नाही असा नरमाईचा पवित्रा बॉलिवूडने ' ए दिल है मुश्किल' चित्रपटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे.

Will not work with Pak artistes now - Bollywood's Sankirtan | यापुढे पाक कलाकारांसोबत काम करणार नाही - बॉलिवूडचा नरमाईचा पवित्रा

यापुढे पाक कलाकारांसोबत काम करणार नाही - बॉलिवूडचा नरमाईचा पवित्रा

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ -' आमच्यासाठी आमचा देश सर्वप्रथम येतो. यापुढे आम्ही कोणत्याही पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही, तसेच त्यांना कोणत्याही चित्रपटात काम देणार नाही ' असा निर्णय प्रोड्युसर्स असोसिएशन घेतल्याचे मुकेश भट्ट यांनी स्पष्ट केले. 'तसेच चित्रपटाच्या सुरूवातील उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येईल तसेच चित्रपट हिट होवो वा फ्लॉप , चित्रपटाच्या कमाईतील काही वाटा उरी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येईल' असेही त्यांनी स्पष्ट केले. एकंदरच बॉलिवूडने नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे  दिसत आहे. मात्र असे असले तरी  मुख्यमंत्री फडणवीस व राज ठाकरेंनी अद्याप या मुद्यावर भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने चित्रपट प्रदर्शनाचे भवितव्य अजूनही अंधारात आहे. 
('ए दिल...'वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी)
  •  
  • ' उरी ' येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला सर्जिकल स्ट्राईक यांनंतर देशभरात पाकविरोधी वातावरण तापलेले असून बॉलिवूडलाही याचा मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानी अभिनेता ' फवाद खान' याच्या भूमिकेमुळे दिग्दर्शक करण जोहरचा बहुप्रतिक्षित 'ए दिल है मुश्किल' चित्रपटही अडचणीत सापडला असून मनसेच्या भूमिकेमुळे चित्रपट प्रदर्शनात अडथळे निर्माण झाले आहेत.  
यावर बॉलिवूड कलाकारांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडेही धाव घेतली होती, मात्र त्यानंतरही मनसे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर करण जोहरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मदत मागितली नुकतीच ' वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, करण जोहर यांच्या दरम्यान चर्चा झाली. त्यावेळी अमेय खोपकर, निर्माते मुकेश भट्ट, सिद्धार्थ रॉय कपूर आदी उपस्थित होते. 

Web Title: Will not work with Pak artistes now - Bollywood's Sankirtan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.