राज्यात १३ कोटी वृक्षलागवड करणार - सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 06:32 AM2018-06-12T06:32:32+5:302018-06-12T06:32:32+5:30

राज्यात १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प करण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

will plant 13 Crores trees in the state -  Sudhir Mungantiwar | राज्यात १३ कोटी वृक्षलागवड करणार - सुधीर मुनगंटीवार

राज्यात १३ कोटी वृक्षलागवड करणार - सुधीर मुनगंटीवार

googlenewsNext

मुंबई -  राज्यात १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प करण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्यात ३ लाख ७ हजार ७१२ चौ.कि.मी च्या भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के म्हणजे जवळपास १ लाख चौ.कि.मी वर वनक्षेत्र पाहीजे. आजमितीस ते ६२ हजार चौ.कि.मी इतके आहे. अजून ३८ हजार चौ कि.मीने वनक्षेत्र वाढवायचे आहे असेही ते म्हणाले.
पहिल्यावर्षी २ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाच्या बदल्यात राज्यात एकाच दिवशी २ कोटी ८३ लाख झाडं लागली तर गेल्यावर्षी ४ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाच्या बदल्यात ५ कोटी ४३ लाख वृक्ष राज्यात लागले. या दोन्ही वर्षांच्या वृक्षलागवडीची नोंद लिम्का बूक आॅफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.
वृक्ष लावल्यानंतर ते जगतात का, याविषयी सातत्याने शंका घेतली जाते. यावर मुनगंटीवार म्हणाले, यात पारदर्शकता आली पाहिजे हे विचारात घेऊन कमांड रुमच्या माध्यमातून लावलेल्या प्रत्येक झाडाचा शोध आपण घेऊ शकू अशा पद्धतीची व्यवस्था विकसित करण्यात आली आहे. अशी कार्यपद्धती अवलंबिल्यानेच महाराष्टÑ देशात प्रथम आले आहे. वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात राज्यात २७३ चौ.कि.मीची भरीव वाढ झाली आहे, कांदळवन संवर्धनात ८२ चौ.कि.मी ची वाढ झाली आहे, बांबू लागवड ४४६२ चौ.कि. वाढली आहे.
केंद्र सरकारने बांबू क्षेत्राच्या विकासासाठी १२९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर वनांमधील जलयुक्त शिवार कामांमुळे वनातील जलव्याप्त क्षेत्रात ४३२ चौ.कि.मी वाढ झाली आहे. कोणाच्या मनात शंका ठेऊन वृक्षलागवडीचे हे मिशन आपल्याला पुढे न्यायचे नाही असेही ते म्हणाले.
महावृक्षलागवड कार्यक्रमात कोकणविभागात फळझाड लागवड, कांदळवन रोपांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. जवळपास २० लाख कांदळवन रोपं या समुद्रकिनाऱ्यालगतच्या जिल्ह्यात लागणार आहेत.

Web Title: will plant 13 Crores trees in the state -  Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.