...मग एकदा काय ते होऊनच जाऊ दे! मशिदींच्या भोंग्यांवरून राज ठाकरेंचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 09:11 PM2022-05-01T21:11:52+5:302022-05-01T21:14:26+5:30

...तर राज्यात काय होईल ते मला माहीत नाही; राज यांचा आक्रमक पवित्रा

Will play Hanuman Chalisa outside mosques from 4th may says mns chief Raj Thackeray | ...मग एकदा काय ते होऊनच जाऊ दे! मशिदींच्या भोंग्यांवरून राज ठाकरेंचा थेट इशारा

...मग एकदा काय ते होऊनच जाऊ दे! मशिदींच्या भोंग्यांवरून राज ठाकरेंचा थेट इशारा

googlenewsNext

औरंगाबाद: मशिदीवरील भोंगे हा धार्मिक विषय नाही. तो सामाजिक आहे. मात्र ज्याला कोणाला हा धार्मिक विषय वाटत असेल, त्यांना मग आम्ही धर्मानेचं उत्तर देऊ, असा थेट इशारा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दिला. ते औरंगाबादच्या सभेत बोलत होते.

आज १ तारीख आहे. परवा ३ तारीख आहे. ईदचा सण आहे. त्या सणाला गालबोट लावायचं नाही. पण ४ तारखेपासून ऐकणार नाही. जिथे जिथे मशिदींवर भोंगे असतील, त्या त्या ठिकाणी लाऊड स्पीकरवर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल. यांना विनंती करून समजत नसेल, तर मग आमच्यासमोर पर्याय नाही, अशा शब्दांत राज यांनी थेट इशारा दिला.

राज यांचं भाषण सुरू असताना मशिदीतून अजानचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यानंतर राज यांनी आक्रमक पवित्रा घेतला. 'माझी पोलिसांना नम्र विनंती आहे. हे जर सभेवेळी बांग सुरु करणार असतील, तर यांच्या तोंडात बोळा कोंबा. यांना सरळ शब्दांत सांगून कळत नसेल, तर राज्यात काय होईल ते मला माहीत नाही,' असं राज ठाकरे म्हणाले.

मशिदीतून सुरू झालेला भोंगा आताच्या आता बंद करा. नीट सांगितलेलं कळतच नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे, असा इशाराच राज यांनी दिला. आम्ही ४ तारखेपासून अजिबात शांत बसणार नाही. महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे, ती यांना दाखवावीच लागेल. देशातल्या हिंदूंना माझी विनंती आहे. ४ तारखेपासून ज्या ज्या मशिदींसमोर भोंगे दिसतील, तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा आणि अनेक वर्षे जुना असलेला हा प्रश्न सोडवा, असं आवाहन राज यांनी केलं.

Web Title: Will play Hanuman Chalisa outside mosques from 4th may says mns chief Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.