PM मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल का? फडणवीसांचा उल्लेख होताच भय्याजी जोशी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:03 IST2025-03-31T13:00:31+5:302025-03-31T13:03:07+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

PM मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल का? फडणवीसांचा उल्लेख होताच भय्याजी जोशी म्हणाले...
Bhaiyyaji Joshi PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपूर दौऱ्यावर होते. साडेचार तासांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्याचबरोबर दीक्षाभूमीवरही ते गेले. त्यांनी माधव नेत्रालयाच्या इमारतीचे भूमिपूजनही केले. मोदींच्या या दौऱ्याबद्दल आरएसएसचे माजी सहकार्यवाह भय्याजी जोशी आनंद व्यक्त केला. माध्यमांकडून त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना त्यांनी महत्त्वाचे भाष्य केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना भय्याजी जोशी म्हणाले, "कालचा कार्यक्रम चांगला झाला. आम्ही आनंदी आहोत. सेवा करण्यात त्यांना आधीपासून आवड आहे. कोरोनाच्या काळातही त्यांनी अशा कामाला प्रेरणा दिली होती. मला वाटतं की काल त्यांचं इथं येणं आणि त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणं, हे माधव नेत्रालयाची उंची वाढवणार आहे."
हेही वाचा >>"औरंगजेबाची कबर म्हणजे महाराजांच्या शौर्याचे प्रतीक, राजकीय पोळी भाजण्यास..."; राज ठाकरेंची टीका
मोदी आणि आरएसएसमध्ये दुरावा आहे का?
मोदी आणि संघामध्ये दुरावा असल्याचे म्हटले जात होते? असा प्रश्न भय्याजी जोशी यांना विचारण्यात आला. ते म्हणाले, "दुरावा वगैरे काही नाहीये. आम्ही हे मानत नाही."
मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संमती लागेल, अशी चर्चा आहे?, असेही त्यांना विचारण्यात आले.
या प्रश्नाला उत्तर देताना भय्याजी जोशी म्हणाले, "उत्तराधिकाऱ्याचा सध्या प्रश्नच कुठे आहे. संघात जी परंपरा आहे, त्यानुसार होईल. तो निर्णय आरएसएस घेईल", असे उत्तर त्यांनी दिले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची उत्तराधिकारी म्हणून चर्चा होत आहे, असा मुद्दा त्यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला. ते म्हणाले, 'याबद्दल मला काही कल्पना नाहीये."
औरंगजेबाची कबरीबद्दल राज ठाकरेंची भूमिका, भय्याजी जोशी म्हणाले...
औरंगजेबाची कबर ठेवण्यात यावी, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मांडली. भय्याजी जोशी म्हणाले, "औरंगजेबाचा विषय विनाकारण उचलून धरण्यात आला आहे. एक आहे की, त्याचा मृत्यू इथे झाला आहे, तर त्याची कबर इथे बनली आहे. ज्यांची श्रद्धा आहे, ते जातील. आम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, त्यांनी अफजल खानाचीही कबर बनवली होती. भारताच्या विविधतेचं आणि उदारतेचं प्रतिक आहे. ती कबर राहिली पाहिजे. ज्याला जावं वाटेल, त्याने जावं", अशी भूमिका भय्याजी जोशी यांनी मांडली.