राज ठाकरे पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार? गुढीपाडवा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 07:16 IST2025-03-30T07:16:47+5:302025-03-30T07:16:56+5:30
MNS Gudi Padwa Melava: शिवाजी पार्क येथे होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्याची ‘मनसे’ने जोरदार तयारी केली आहे. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ कुणावर धडाडणार आणि ते आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार का? याकडे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार? गुढीपाडवा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष
मुंबई - शिवाजी पार्क येथे होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्याची ‘मनसे’ने जोरदार तयारी केली आहे. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ कुणावर धडाडणार आणि ते आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार का? याकडे लक्ष लागले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान, विधिमंडळ अधिवेशनामधील औरंगजेबाची कबर ते कामरा आणि त्यापाठोपाठ रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी या विषयावर ते काय भाष्य करणार, याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. राज्यभरातून या मेळाव्यासाठी सुमारे १ लाख मनसैनिक येतील, अशी माहिती मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली.