रविंद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? निकाल राखीव ठेवला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 08:22 AM2024-12-12T08:22:56+5:302024-12-12T08:23:24+5:30
फेरमतमोजणीसाठी अर्ज करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. तसेच मोबाइल नेण्यास मनाई असलेल्या क्षेत्रात वायकरांच्या निकटवर्तीयांना मोबाइल नेण्यास परवानगी दिली गेली, असा आरोप किर्तीकर यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिंदेसेनेचे नेते रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या निवडीला आव्हान देणाऱ्या उद्धवसेनेचे नेते अमोल किर्तीकर यांच्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून वायकर यांनी ४८ मतांच्या फरकाने किर्तीकर यांचा पराभव केला होता.
फेरमतमोजणीसाठी अर्ज करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. तसेच मोबाइल नेण्यास मनाई असलेल्या क्षेत्रात वायकरांच्या निकटवर्तीयांना मोबाइल नेण्यास परवानगी दिली गेली, असा आरोप किर्तीकर यांनी केला आहे. न्या. संदीप मारणे यांच्या एकलपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला.
कायद्याने परवानगी असूनही आपल्या एजंटला निवडणूक अधिकाऱ्यांच्या टेबलजवळ बसू दिले नाही. कमी मतांच्या फरकाने निवडणूक हरल्यानंतर फेरमतमोजणीचा अधिकार असतानाही निवडणूक अधिकाऱ्यांनी तो नाकारला. आपल्याला पराभूत करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले, असे किर्तीकर यांनी याचिकेत म्हटले आहे.