ग्रा.पं.मधील नळयोजना सौरऊर्जेवर चालविणार

By Admin | Published: September 22, 2016 05:12 AM2016-09-22T05:12:43+5:302016-09-22T05:12:43+5:30

राज्यातील सर्व ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या नळ योजना सौर ऊर्जेवर आणून त्या नळ योजनांवर अल्ट्रा वॉटर फिल्टर लावण्यात यावे.

Will run on the solar energy plant in Gram Panchayat | ग्रा.पं.मधील नळयोजना सौरऊर्जेवर चालविणार

ग्रा.पं.मधील नळयोजना सौरऊर्जेवर चालविणार

googlenewsNext


मुंबई : राज्यातील सर्व ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या नळ योजना सौर ऊर्जेवर आणून त्या नळ योजनांवर अल्ट्रा वॉटर फिल्टर लावण्यात यावे. दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिले.
मुंबईत मंत्रालयात बुधवारी ऊर्जामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाऊर्जाच्या नियामक मंडळाची आढावा बैठक झाली. या बैठकीत दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायतीकडील नळ योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे लक्ष्य महाऊर्जाला देण्यात आले. बैठकीला ऊर्जा सचिव बिपीन श्रीमाळी, महाऊर्जाचे महासंचालक नितीन गद्रे, मराविमं सुत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक, महाऊर्जाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक पुरुषोत्तम जाधव, महाव्यवस्थापक उमाकांत पांडे आदी उपस्थित होते.
आदिवासी, माडा, मिनी माडा, दुर्गम भागातील ग्राम पंचायतींचाही या योजनेत समावेश असेल. पथदिवे बॅटरी बॅकअपसह लावण्यात यावे. १०० टक्के आॅफ ग्रिड पॉलिासी अंतर्गत सर्व पथदिवे लावावेत. त्यासाठी किती खर्च लागणार याचा अभ्यास करु न प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्र्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Will run on the solar energy plant in Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.