बचेंगे तो और भी लडेंगे : छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 11:50 AM2018-06-08T11:50:34+5:302018-06-08T11:50:34+5:30
आर्थर रोड जेलमधून बाहेर पडल्यावर कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं.
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी 27 महिने अटकेत असलेले माजी खासदार समीर भुजबळ काल जामीनावर तुरुंगाबाहेर आले. आर्थर रोड जेलमधून बाहेर पडल्यावर कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. सुटका झाल्यानंतर समीर भुजबळांनी निवासस्थानी छगन भुजबळांची भेट घेतली. यावेळी बचेंगे तो और भी लड़ेंगे, अशी गर्जना छगन भुजबळांनी केली.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामातील घोटाळ्याप्रकरणी भुजबळ काका-पुतण्या तुरुंगात होते. सुटका झाल्यानंतर समीर भुजबळांनी निवासस्थानी छगन भुजबळांची भेट घेतली. यावेळी बचेंगे तो और भी लड़ेंगे, अशी गर्जना छगन भुजबळांनी केली. दरम्यान सुटका झाल्यानंतर समीर भुजबळांनी सिद्धीविनायक आणि अंजिरवाडी गणपतीचं दर्शन आहे.. मनी लॉण्डरिंग अॅक्टच्या प्रकरणात कमाल सात वर्षांची शिक्षा आहे. समीर भुजबळ यांनी त्यापैकी एक तृतीयांश कालावधी गजाआड काढला आहे.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने विशिष्ट मुद्द्यांवर 4 मे रोजी जामीन मंजूर केला होता. त्याच आधारे समीर यांना जामीन मंजूर करीत असल्याचे न्या. अजय गडकरी यांनी बुधवारी स्पष्ट केले. समीर यांनी महाराष्ट्र आणि गोव्याबाहेर जाऊ नये, अशी अटही न्यायालयाने घातली आहे.