Devendra Fadnavis : आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार! फडणविसांचं महत्वाचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 04:06 PM2022-08-07T16:06:29+5:302022-08-07T16:08:09+5:30
"आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोकं विचार करत आहात त्याच्याही आधी आम्ही करू."
भाजप नेते तथा राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आणि शिवसेना-भाजप युतीसंदर्भात महत्वाचे विधान केले आहे. "भाजपने गेल्या सहा महिन्यांपासून 16 मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेची पुढची निवडणूक आम्ही शिवसेना भाजप युतीत लढणार. त्यामुळे जे आमच्यासोबत आहेत त्यांना निवडून आण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. तसेच आमचा पक्ष जरी आम्ही मजबूत केला, तरीही ती संपूर्ण शक्ती आम्ही शिवसेनेचे जे खासदार आमच्या सोबत आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठीच खर्ची घालणार आहोत," असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
तुम्ही विचार करत आहात, त्याच्याही आधी आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करू -
याच वेळी राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भातही फडणवीस यांनी भाष्य केले. "सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळाचा विस्तार करु नका, असे कुठेही म्हटलेले नाही. न्यायालयातील सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबध नाही. म्हणूनच मी सांगिले, की आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोकं विचार करत आहात त्याच्याही आधी आम्ही करू," असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
तसेच, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी चर्चा अनेकजण करत आहेत, असे विचारले असता, यावर, कोण काय म्हणत आहे, याला काहीही अर्थ नाही. यावर उत्तर द्यायला मी काही रिकामा नाही. राजकारणात परिस्थिती काय आहे, याला महत्व असते, असे फडणवीस म्हणाले.