नसरापूरकरांचे प्रश्न लावणार मार्गी

By admin | Published: May 30, 2016 01:36 AM2016-05-30T01:36:00+5:302016-05-30T01:36:00+5:30

भोर तालुक्यात महत्त्वाच्या असणाऱ्या नसरापूर बाजारपेठेतील विकासकामे, वाहतूक समस्या, पिण्याचे पाणी आदी प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील

Will solve the problems of Nasrpupar | नसरापूरकरांचे प्रश्न लावणार मार्गी

नसरापूरकरांचे प्रश्न लावणार मार्गी

Next


नसरापूर : भोर तालुक्यात महत्त्वाच्या असणाऱ्या नसरापूर बाजारपेठेतील विकासकामे, वाहतूक समस्या, पिण्याचे पाणी आदी प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील, असे आश्वासन नसरापूर ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले. मात्र, नसरापुरात अजूनही अनेक विभागांत नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत असल्याबाबत ‘लोकमत आपल्या दारी’ कार्यक्रमात नागरिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विविध प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
नसरापूर गावाच्या विकासकामाला माझा कधीच विरोध नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चेलाडी - मढे घाट रस्ता संपादनाकरिता आततायीपणा करून घिसाडघाईचे धोरण अवलंबिले आहे. रस्ता संपादनाकरिता संबंधित बाधितांना विचारात न घेता दांडगाईने रस्त्याच्या दोन्ही बाजूला १५/१५ मीटर मार्किंग केले. मुळात या रस्त्याच्या दोन्ही बाजूस कशाच्या आधाराने मार्किंग केले अशी विचारणा भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सहसचिव प्रकाश जंगम यांनी सार्वजनिक खात्याचे अभियंता एल. आर. ठाणगे यांना केली असता, त्यांनी या रस्त्याच्या कामाविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला, मात्र यातून तोडगा निघू शकला नाही, तरी ‘लोकमत आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या फलश्रुतीमुळे लवकरच या रस्त्यालगत असणाऱ्या नसरापूर येथील बाधितांची व सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.
या वेळी ग्रामपंचायत नसरापूरचे सरपंच डॉ. गणेश हिवरेकर, उपसरपंच सुमन घाटे, ग्रा.पं.सदस्य संदीप कदम, विक्रम कदम, माया शेटे, ग्रामविकास अधिकारी ए. डी. जगताप, डॉ. शाम दलाल, भोर तालुका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मुरलीधर दळवी, सामाजिक कार्यकर्ते यशवंत कदम, भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सहसचिव प्रकाश जंगम, खरेदी विक्री संघाचे संचालक ज्ञानेश्वर झोरे, माजी सरपंच प्रकाश चाळेकर, नसरापूर मंडलाधिकारी रमेश सोनवणे, तलाठी सुधीर तेलंग, कृषी अधिकारी नाना डिंबळे, कृषी पर्यवेक्षक ए. के. जगताप, कृषी सहायक ए. ए. चव्हाण, वनपाल अनिल लांडगे, वैद्यकिय अधिकारी श्रुती साबणे, राजगड पोलीस ठाणे गोपनीयचे विशाल नगरे, पी.डी.सी.सी. बँकेचे शाखा व्यवस्थापक आशिष मारणे, उषा राशिनकर, ज्ञानोबा वाल्हेकर, रमेश कदम, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गोपाळ ननावरे, शिवहर पंडित, शरद भुतकर, अग्निहोत्रचे दत्तात्रय वाल्हेकर, महावितरणचे विशाल गवळी, भालचंद्र गायकवाड, मनोज कुंभार, किरण भदे, दिलीप डेरे, विजय जंगम, प्रवीण शेटे, रामचंद्र शेटे, पोपट पालकर, नीलेश पवार, सुधीर शेडगे, आरोग्य सहायक प्रताप पाटील, गोट्या शेटे, विद्याधर राशिनकर, गणेश पानसरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: Will solve the problems of Nasrpupar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.