अनधिकृत बांधकाम प्रश्न सोडविणार
By admin | Published: October 1, 2014 12:25 AM2014-10-01T00:25:10+5:302014-10-01T00:25:10+5:30
‘‘अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढला असून, राज्यात सरकार आल्यानंतर या प्रश्नांची सोडवणूक करू’’, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
Next
>पिंपरी : ‘‘अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढला असून, राज्यात सरकार आल्यानंतर या प्रश्नांची सोडवणूक करू’’, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुलात आयोजित सभेत ते बोलत होते. जिल्ह्यातील भाजपाचे उमेदवार या वेळी उपस्थित होते.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना गडकरी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. त्याचे व्याज दिले तर विकास कशातून करायचा हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्र कजर्बाजारी कोणामुळे झाला, का झाला, ज्या कामात भ्रष्टचार झाला, तो कोणामुळे झाला याची माहिती जनतेला मिळायला हवी. चुकीच्या कामांमुळे महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेला आहे. सिंचनाबाबत श्वेतपत्रिका काढली त्यात आलेली माहिती धक्कादायक आहे. 7क् हजार कोटी खचरून सिंचन मात्र क्.1 टक्के वाढले. आजही शेतीला पाणी मिळत नाही. सिंचनाचा पैसा गेला कुठे? भ्रष्टाचार वाढल्यामुळे शेती आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर वीज नाही. एकेकाळी वीजनिर्मितीत आघाडीवर असणा:या राज्यात आज वीज नाही. त्यामुळे शेतमालाला भाव नाही. यातून कजर्बाजारी झालेल्या शेतक:यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही. वीज नसल्याने पंपावर कर्ज झाले आहे. व्याजाचा मीटर चालू झाल्याने वीज मीटर बंद झाला आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळत नाही. व्यापारी एलबीटीने त्रस्त आहेत. एकाही क्षेत्रत समाधान नाही.’’
गडकरी म्हणाले, ‘‘जात, पंथ, भाषेचा आधार घेऊन भाजपा काम करीत नाही. शिवाजीमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या नावाने लक्ष्मीदर्शनाचे काम आघाडी सरकारने केले आहे. मुख्यमंत्री फायलींवर बसून आहेत. म्हणूनच शरद पवार म्हणाले होते, त्यांच्या हाताला लकवा मारलाय, ते खरे आहे.’’
जगताप म्हणाले, ‘‘नागपूरचा विकास झाला, तसा पिंपरी-चिंचवडचा विकास झाला नाही. या शहराचे शांघाय करण्याची गरज आहे. विनापरवाना बांधकामे, पूररेषा, शास्तीकराचे प्रश्न सुटण्यासाठी मी भाजपामध्ये आलो आहे.’’ (प्रतिनिधी)
पुण्यातही मेट्रो, रस्ते विकासास प्राधान्य,
देहू-आळंदी-पंढरपूर पालखी मार्गास पाच हजार कोटी, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण, सोलापूर-कोल्हापूर अशा विविध रस्त्यांच्या 4क् हजार कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. नागपूरला मेट्रो आली, तर मुख्यमंत्र्यांना पोटदुखी झाली. नागपूरला अगोदर मेट्रो कशी, असा प्रश्न त्यांनी केला. तुमची फाईल कोठे होती? मंत्रलयातच ना, कारण तुम्हीच तिच्यावर बसून होतात. कोणताही प्रस्ताव दिला नसताना मेट्रो येईल कशी? आम्हाला विकासाचे राजकारण करायचे आहे. पुण्यातही मेट्रो येईल.
आरटीओ कार्यालय व पांढ:या वेशातील पोलिसांची गरज भासणार नाही. कारण सर्व परवाने ऑनलाइन केले जातील. एखाद्या मंत्र्याने सकाळी सिग्नल तोडला, तर दंडाची पावती त्याच्या घरी सायंकाळी पोहोचेल. देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचे ध्येय आहे.
- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री