‘वक्फच्या हडपलेल्या जमिनी परत घेणार’
By admin | Published: April 7, 2016 02:30 AM2016-04-07T02:30:04+5:302016-04-07T02:30:04+5:30
राज्यातील वक्फ बोर्डाच्या गेल्या १५ वर्षांत हडपलेल्या जमिनी परत घेऊन बोर्डाला देण्यात येतील आणि वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांची प्रसंगी सीबीआय चौकशी केली
मुंबई : राज्यातील वक्फ बोर्डाच्या गेल्या १५ वर्षांत हडपलेल्या जमिनी परत घेऊन बोर्डाला देण्यात येतील आणि वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांची प्रसंगी सीबीआय चौकशी केली जाईल, असे अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलिप कांबळे यांनी आज विधानसभेत सांगितले.
अल्पसंख्यांक विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. विविध सदस्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या झालेल्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.
तर यावेळी अल्पसंख्यांक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी यापुढे राज्य सरकारने वक्फ बोर्डाच्या मालमत्ता खरेदी आणि विक्री करण्यास बंदी असल्याचे स्पष्ट केले.
याप्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)