उद्या किंवा परवा निर्णय जाहीर करू; सरकार खंबीरपणे मराठा समाजासोबत- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 08:54 PM2020-09-16T20:54:52+5:302020-09-16T21:19:38+5:30

सरकार, विरोधी पक्ष सगळेच तुमच्या पाठिशी, आंदोलन करू नका; मुख्यमंत्र्यांचं मराठा समाजाला आवाहन

will take decision in two days about maratha reservation says cm uddhav thackeray | उद्या किंवा परवा निर्णय जाहीर करू; सरकार खंबीरपणे मराठा समाजासोबत- मुख्यमंत्री

उद्या किंवा परवा निर्णय जाहीर करू; सरकार खंबीरपणे मराठा समाजासोबत- मुख्यमंत्री

googlenewsNext

मुंबई: मराठा आरक्षण प्रकरणात सर्व पक्ष सोबत आहोत. यासाठी तज्ज्ञांशी संवाद सुरू असून आम्ही एक मार्ग, एक दिशा ठरवण्याच्या जवळ आलो आहोत. उद्या किंवा परवा याबद्दलचा निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

'गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानंमराठा आरक्षणाचा विषय मोठ्या घटनापीठाकडे सोपवला. मात्र त्याचवेळी आरक्षणाला स्थगितीही दिली. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. यातून कायदेशीर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय सर्व पक्षांनी मिळून घेतला होता. आताही सगळे पक्ष मराठा समाजाच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. विरोधकांनीदेखील सरकारला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे,' असं मुख्यमंत्री म्हणाले. सर्व पक्ष तुमच्या सोबत आहेत. त्यामुळे आंदोलनं करू नका, असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं.

मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे -खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी

मराठा आरक्षण प्रकरणात आज सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत दोन महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 'पुढील न्यायालयीन लढाई कशी लढायची आणि तोपर्यंत मराठा समाजाला दिलासा कसा द्यायचा, यावर आज चर्चा झाली. सरकारनं सगळ्यांच्या सूचना ऐकून घेतल्या असून उद्या किंवा परवा निर्णय जाहीर करण्यात येईल. याआधी न्यायालयात ज्या वकिलांच्या टीमनं युक्तिवाद केला, तीच टीम पुढेही कायम राहील,' असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

“आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास चिघळण्याचीच शक्यता जास्त”; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

सर्वपक्षीय बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण प्रकरणात सरकारला सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. 'सध्या मराठा समाजात भीतीचं वातावरण आहे. आम्ही राज्य सरकारला सहकार्य करणार आहोत,' असं फडणवीस म्हणाले. सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र ठाकरे सरकारच्या कार्यकाळात सारथी कमकुवत झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे, अशी टीका त्यांनी केली.

Maratha Reservation-तमिळनाडू व महाराष्ट्राला वेगवेगळा न्याय का?

Web Title: will take decision in two days about maratha reservation says cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.