देशाच्या राजकारणात लवकरच खळबळ; शरद पवारांच्या मातोश्रीभेटीनंतर राऊतांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 09:32 PM2020-07-06T21:32:46+5:302020-07-06T21:56:50+5:30
शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल असे सुतोवाच राऊत यांनी केले आहे.
मुंबई : पारनेरमध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडल्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. तसेच पोलीस बदल्यांवरूनही दोन्ही पक्षांमध्ये वाद असल्याची चर्चा आहे. यावरून आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले होते. ते बाहेर येत नाहीत तोच संजय राऊत यांनी मोठी घोषणा करून टाकली आहे.
शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल असे सुतोवाच राऊत यांनी केले आहे. काही वेळापूर्वीच राऊत यांनी ट्विट करून पवारांची मुलाखत घेत असलेला फोटो पोस्ट केला आहे. तसेच सामनामध्ये ही मुलाखत प्रसिद्ध करण्यात येणार असून वृत्त वाहिन्यांवरही ती पाहता येईल असे राऊत म्हणाले आहेत.
देशाचे नेते मा.शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात प्रसिद्ध होइल आणि वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल..@PawarSpeaks चीन पासून महाराष्ट्रातील घडामोडी पर्यंत जोरदार बोलले. pic.twitter.com/pTdCKucP0n
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 6, 2020
शरद पवार हे चीन ते महाराष्ट्रातील घडामोडींबाबत जोरदार बोलल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारमध्ये सारेकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. चार दिवसांपूर्वी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या तीन दिवसांत अचानक रद्द करण्यात आल्या. यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेनेत वितुष्ट निर्माण झाल्याचे बोलले जात होते. त्यातच पारनेरच्या पाच शिवसेना नगरसेवकांनी बारामती गाठत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. हे देखील ठाकरेंच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. यामुळे आजच्या बैठकीत ठाकरे यांनी पवारांकडे पारनेरचे नगरसेवक परत द्या, असे सांगितल्याचे समजते. या सगळ्या राजकारणावरून ठाकरे सरकार पडणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. नेमक्या याच वेळी संजय राऊतांनी पवारांच्या मुलाखत घेतल्याचे जाहीर केल्याने सरकारमध्ये आलबेल असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
ठाकरे सरकारला दणका! अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं शिक्षण विभागाला पत्र
गुड न्यूज! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संखेत मोठी घट
टाटा पुन्हा मदतीला धावले! मुंबई मनपाला १० कोटी, १०० व्हेंटीलेटर्स, २० रुग्णवाहिका
ठरलं! 8 जुलैपासून हॉटेल्स - लॉज उघडणार, पण...; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा
एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले
गृहमंत्र्यांनी पोलीस बदल्यांची मुख्यमंत्र्यांना कल्पनाच दिली नसेल; देवेंद्र फडणवीसांना वेगळीच शंका
लढाईला तयार रहा! PUBG चा नवा मॅप येड लावणार; उद्या मोठी अपडेट मिळणार