मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?; आजच्या सर्वपक्षीय बैठकीत कोण कोण उपस्थित राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 03:22 PM2023-09-11T15:22:23+5:302023-09-11T15:24:07+5:30

सगळ्यांनी मिळून सकारात्मक विचार केला तर समाजाचे भले होईल असा विश्वास मला वाटतो अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठकीवर व्यक्त केली.

Will there be a solution to the Maratha reservation?; Who will attend today's all-party meeting? | मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?; आजच्या सर्वपक्षीय बैठकीत कोण कोण उपस्थित राहणार?

मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?; आजच्या सर्वपक्षीय बैठकीत कोण कोण उपस्थित राहणार?

googlenewsNext

मुंबई – जालना येथील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर राज्यात पुन्हा मराठा आरक्षण मुद्दा ऐरणीवर आला. अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या १४ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सरसकट मराठ्यांना कुणबीत आरक्षण द्यावे या मागणीसाठी ते आग्रही आहे. सरकारने या प्रकरणी २ जीआर काढले, समिती स्थापन केली तरीही जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. आता जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपली असल्याने त्यांनी पाणी आणि उपचारही घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षण प्रश्न चिघळत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. परंतु कायद्याच्या चौकटीत निर्णय घ्यावा लागेल. जर आम्ही तसा आदेश काढला तर मराठा समाजाची फसवणूक होईल. त्यामुळे जे आरक्षण दिलं जाईल ते कायद्याच्या चौकटीत दिले जाईल आणि ते कोर्टातही टिकेल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितले. तर राज्यात समाजाचे प्रश्न निर्माण होतात, तेव्हा हे मुद्दे राजकीय पक्षांच्या पलीकडचे असतात. हे सगळ्यांनी मिळून समाजाचा विचार करायचा असतो. मराठा समाज असो वा वेगवेगळया समाजाचे प्रश्न समोर येतायेत. सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून राज्याने यावर राजकारण न करता समाजाचे हित साधता येईल त्यासाठी प्रयत्नशील आहोत. लोकशाहीत आंदोलन करणे प्रत्येकाचा अधिकार आहे. प्रश्न सोडवायचे असतील तर कोर्टात टिकलेही पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून सकारात्मक विचार केला तर समाजाचे भले होईल असा विश्वास मला वाटतो अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठकीवर व्यक्त केली.

आजच्या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार?

  1. महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री,
  2. उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री
  3. ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री
  4. उद्योग मंत्री
  5. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री
  6. राज्य उत्पादन शुल्क मंत्री
  7. अशोक चव्हाण, माजी मुखमंत्री तथा कॉग्रेस नेते
  8. अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता, विधानपरिषद
  9. विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेता, विधानसभा
  10. उदयनराजे भोसले, राज्यसभा सदस्य
  11. नाना पटोले, आमदार, प्रदेशाध्यक्ष, कॉग्रेस
  12. बाळासाहेब थोरात, आमदार, काँग्रेस
  13. जयंत पाटील, आमदार, राष्ट्रवादी
  14. राजेश टोपे, आमदार, राष्ट्रवादी
  15. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार, प्रदेशाध्यक्ष, भाजपा
  16. जयंत पाटील, आमदार, शेतकरी कामगार पक्ष
  17. हितेंद्र ठाकूर, आमदार, बहुजन विकास आघाडी
  18. कपिल पाटील, आमदार, लोकभारती पक्ष
  19. विनय कोरे, आमदार, जनसुराज्य पक्ष
  20. महादेव जानकर, आमदार, राष्ट्रीय समाज पक्ष
  21. बच्चू कडू, आमदार, प्रहार जनशक्ती पक्ष
  22. राजू पाटील, आमदार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  23. रवी राणा, आमदार
  24. विनोद निकोले, आमदार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
  25. संभाजीराजे भोसले, माजी राज्यसभा सदस्य
  26. प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी
  27. सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटना
  28. जोगेंद्र कवाडे, पीपल्स रिपब्लिकन पक्ष
  29. राजेंद्र गवई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)
  30. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य
  31. अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग
  32. प्रधान सचिव, विधि व न्याय विभाग

 

आज संध्याकाळी ७.३० वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार असून वरील नेत्यांना शासनामार्फत बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

Web Title: Will there be a solution to the Maratha reservation?; Who will attend today's all-party meeting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.