पापलेट नामशेष होणार?
By Admin | Published: April 26, 2016 04:27 AM2016-04-26T04:27:49+5:302016-04-26T04:27:49+5:30
पालघर-पालघर जिल्ह्यातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराना आर्थिक सुबत्ता देणारो पापलेट नामशेष होण्याची चिन्हे आहेत.
हितेन नाईक,
पालघर-पालघर जिल्ह्यातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराना आर्थिक सुबत्ता देणारो पापलेट नामशेष होण्याची चिन्हे आहेत. पापलेट च्या मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सातपाटीच्या दोन संस्थामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ३२४ टन (तीन लाख २४ हजार किलो) पापलेटची आवक कमी झाली आहे. पालघर जिल्ह्यात ‘करल्या डोली’ द्वारे पापलेटच्या लहान पिल्लाची होणारी खुलेआम कत्तल हे या मागचे प्रमुख कारण असल्याचे माहीत असूनही पालघर, वसई, उत्तनमधील काही मच्छीमारांनी आतापासून पुन्हा करल्या डोलीच्या मच्छीमारीला मोठ्या प्रमाणात सुरु वातही केली आहे.
राज्याला ७२० किमी च विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून देशाला मत्स्य उत्पादनातून परकीय चलन मिळवून देणारा हा एक प्रमुख व्यवसाय आहे. परंतु मोठ्या यांत्रिकी, अद्ययावत सामुग्री नौकांद्वारे केली जाणारी अपरिमति मासेमारी, पर्ससीन जाळ्यांद्वारे होणाऱ्या मासेमारीमुळे, रासायनिक करखान्यातून सोडण्यात येणारे प्रदूषित सांडपाणी- ओएनजीसी प्रकल्पातून होणारी तेल गळती, शासनाचे मच्छीमारांप्रती असलेले उदासीन धोरण अशा विविध कारणांमुळे मासेमारी व्यवसायाला फटका बसू लागला आहे.
मागील अनेक वर्षापासून राज्य शासनाने मासेमारी नियम अधिनियम १९८१ च्या अनुषंगाने १० जून ते १५ आॅगस्ट असा ६६ दिवसांचा पावसाळी मासेमारीबंदी कायदा घोषित करुन त्याची कडक अंमलबजावणी केल्याने मत्स्य प्रजनन आणि संवर्धन होवून मत्स्य उत्पादन समाधानकारक सुरु होते. परंतु पर्ससीनसारख्या मासेमारीमुळे दिवसेंदिवस मत्स्य उत्पादनात घट होऊ लागल्याने ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सर्व संस्थानी एकजूट दाखवित १५ मे पासून संपूर्ण मासेमारी बंद ठेवून मत्स्य प्रजनन आणि संवर्धनला हातभार लावला होता. या उपक्र माला राज्य सरकारनेही पाठिंबा दिला. त्यामुळे पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीत मोठी वाढ होईल, असे मच्छीमार संस्थांना अपेक्षित होते. राज्य सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर त्याचे परिणाम दिसेपर्यंत केंद्र सरकारने १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा कमी कालावधी जाहीर केला. त्यामुळे मासेमारीच्या संवर्धनाचा कालावधी वाढविण्यापेक्षा तो घटवण्यामागे नेमके काय कारण आहे, ते मच्छीमारांना समजू शकलेले नाही.