विदर्भ विकासाची गाडी धावेल का?

By admin | Published: February 27, 2015 02:38 AM2015-02-27T02:38:20+5:302015-02-27T02:38:20+5:30

विदर्भातील १० वर्षांपासून पडून असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी यावेळच्या रेल्वे अर्थसंल्पात फार मोठ्या निधीची तरतूद होऊन

Will Vidarbha run a development road? | विदर्भ विकासाची गाडी धावेल का?

विदर्भ विकासाची गाडी धावेल का?

Next

नागपूर : विदर्भातील १० वर्षांपासून पडून असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी यावेळच्या रेल्वे अर्थसंल्पात फार मोठ्या निधीची तरतूद होऊन हे प्रकल्प गती घेतील,अशी अपेक्षा होती. ती १०० टक्के पूर्ण झाली नसली तरी यावेळी सुरेश प्रभू यांनी बहुतांश प्रकल्पांसाठी थोडा-थोडा का होईना निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या प्रकल्पांचे काम मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यामुळे मदत होणार आहे.
विदर्भासाठी सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे २७० किमी लांबीचा वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग. विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही मागास भागांच्या विकासाची गाडी रुळावर आणण्यासाठी हा प्रकल्प पूर्णत्वास जाणे अत्यंत आवश्यक आहे.
यावेळी या प्रकल्पासाठी एकूण १३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील ३५ कोटी रुपये रेल्वे स्वत: देणार आहे तर १०० कोटी रुपये खासगी सहभागातून उभारण्यात येणार आहे. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी २००० साली ही मागणी उचलून धरली होती. २००६ मध्ये रेल्वे मंत्रालयाने याला मान्यता दिली.
२००९ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते या मार्गाचे भूमिपूजन झाले होते. पण तुटपुंज्या तरतुदीमुळे या मार्गाचे केवळ ३.७ टक्के कामच पूर्ण झाले आहे. यावेळी कामाला गती येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. बडनेरा येथे रेल्वे कोच दुरुस्ती कारखाना निधीअभावी रखडला होता यावेळी या प्रकल्पासाठी २४.५८ लाख रुपयांची तरतूद करून या प्रकल्पाला गती देण्याचे काम प्रभू यांनी केले.

Web Title: Will Vidarbha run a development road?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.