आज शेतकऱ्यांसमोर माफी मागणार का?; उद्धव ठाकरेंना भाजपानं विचारला खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 10:43 AM2022-10-23T10:43:45+5:302022-10-23T10:47:02+5:30

तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पुढील वर्षभरात ही घोषणा कोणत्या बासनात बांधली? असं भाजपानं विचारलं.

Will you apologize to the farmers today?; BJP asked Uddhav Thackeray question | आज शेतकऱ्यांसमोर माफी मागणार का?; उद्धव ठाकरेंना भाजपानं विचारला खोचक सवाल

आज शेतकऱ्यांसमोर माफी मागणार का?; उद्धव ठाकरेंना भाजपानं विचारला खोचक सवाल

googlenewsNext

मुंबई - शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची विचारपूस करणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर भाजपाने निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना भेटायला जात आहेत जरुर जावे परंतु काही प्रश्नांची उत्तरेही द्यावीत असं सांगत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरेंना प्रश्न विचारले आहेत. 

केशव उपाध्ये म्हणाले की, चिपळूण येथील अपरांत रुग्णालयात मागील वर्षी जुलै महिन्यात पूर परिस्थितीमुळे मरण पावलेल्या ८ कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना विशेष बाब म्हणून प्रत्येकी ४ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली होती. पुढे एक वर्ष उलटल्यानंतरही ही मदत मिळालीच नाही. तुमच्या पोकळ आश्वासनावर आपत्तीग्रस्तांनी आज प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर देणार?. वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल अशी घोषणा आपण गेल्या वर्षी २५ जुलै रोजी केली होती. तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पुढील वर्षभरात ही घोषणा कोणत्या बासनात बांधली? असं त्यांनी विचारलं. 

त्याचसोबत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसण्याची गरज होती तेव्हा मुख्यमंत्री असूनही तुम्ही पुलावर अंथरलेल्या रेड कार्पेटवर उभे राहून मदतीची केवळ आश्वासने दिलीत. तेव्हा संकटात खचलेला शेतकरी पुढे वर्षभरात सावरावा यासाठी तुमच्या सरकारने काय केले शेतकऱ्यांना वरदान ठरलेली जलयुक्त शिवार ही शेततळी योजना बंद करून शेतकऱ्याचे पाणी तोडल्यावर तुम्ही ४ फेब्रुवारी २०२१ रोजी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबविण्याची घोषणा केली होती. पुढच्या दीड वर्षात या घोषणेचे कागदी घोडे कोणत्या बासनात बांधले? असंही केशव उपाध्ये म्हणाले. 

दरम्यान, जिरायत, बागायत जमिनीसाठी ₹ ६,८०० प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ₹ १०,०००  देणार, फळपिकांसाठी १८,००० रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५,००० रुपये प्रति हेक्टर (२ हेक्टरच्या मर्यादेत) मदत करण्यात येईल. असे २३ ऑक्टोबर २०२० रोजी जाहीर केले होते. दोन वर्षांनंतरही अनेक शेतकऱ्यांना ही मदत मिळालीच नाही. याची जबाबदारी घेऊन आज शेतकऱ्यासमोर माफी मागणार का? असा खोचक सवालही भाजपाने उद्धव ठाकरेंना विचारला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Will you apologize to the farmers today?; BJP asked Uddhav Thackeray question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.