४२ कोटी मिळणार का ?
By admin | Published: January 4, 2015 01:03 AM2015-01-04T01:03:51+5:302015-01-04T01:03:51+5:30
विदर्भ वैधानिक विकास मंडळाकडून मिळणाऱ्या विशेष निधीसाठी जिल्हा नियोजन विभागाने ४ २ कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव सादर केले आहे.
जिल्हा नियोजन विभागाचा प्रस्ताव : तीन वर्षांपासून निधी नाही
नागपूर : विदर्भ वैधानिक विकास मंडळाकडून मिळणाऱ्या विशेष निधीसाठी जिल्हा नियोजन विभागाने ४ २ कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव सादर केले आहे.
विदर्भाच्या विकासासाठी वैधानिक विकास मंडळाला १०० कोटींचा निधी मिळतो. गत तीन वर्षांपासून हा निधी मिळाला नव्हता. गत आघाडी सरकारने शेवटच्या वर्षात या निधीची तरतूद केली. या निधीतून विदर्भातील सर्व जिल्ह्यांना लोकसंख्या आणि मानव विकास निर्देकांच्या आधारे निधीचे वाटप केले जाते. या निकषात अग्रस्थानी असल्याने नागपूर जिल्ह्याला अधिक निधी मिळण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने ४२ कोटींचे विकास कामांचे प्रस्ताव मंडळाकडे सादर केले आहेत. (प्रतिनिधी)
गाळ काढण्यासाठी १२ कोटींची गरज
जिल्ह्यात १२३ लघु सिंचन तलाव , ५६ पाझर तलाव, ७ पाझर तलाव, ३९ गाव तलाव, २१४ मालगुजारी तलाव, ८८७ साठवण बंधारे, ७२८ कोल्हापुरी बंधारे आहेत. यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहेत. तो काढण्यासाठी जि.प.च्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीने जिल्हा नियोजन समितीकडे १२ कोटीची मागणी केली आहे.