एक झुंज धनुर्विद्येतील जेतेपदासाठी
By admin | Published: August 10, 2014 02:30 AM2014-08-10T02:30:01+5:302014-08-10T02:30:01+5:30
कुसुमाग्रजांच्या या काव्यपक्तीप्रमाणो पाटकूलचा ‘एकलव्य’ आई-वडिलाविना अन् शेती हेच प्रशिक्षण केंद्र मानून धनुर्विद्येतील जेतेपदासाठी लढत आहे. मात्र त्याच्या जिद्दीला हवे आहे,
Next
>महेश कोटीवालेल्ल
वडवळ (जि. सोलापूर)
मोडून पडला संसार तरी
मोडला नाही कणा,
पाठीवर हात ठेवून सर
नुसतंच लढ म्हणा..
कुसुमाग्रजांच्या या काव्यपक्तीप्रमाणो पाटकूलचा ‘एकलव्य’ आई-वडिलाविना अन् शेती हेच प्रशिक्षण केंद्र मानून धनुर्विद्येतील जेतेपदासाठी लढत आहे. मात्र त्याच्या जिद्दीला हवे आहे, मदतीचे बळ.
पाटकूल (ता. मोहोळ) येथील बीएस्सी. अॅग्री झालेला अजित वसेकर हा तीन भावांचा सांभाळ करीत शेती करतोय. अन् आंतरराष्ट्रीय पातळीवर धनुर्विद्येत चमकण्यासाठी शेतातच सलग आठ तास सराव करतोय, तोही एकलव्यासारखा.
शालेय, जिल्हास्तरावर धनुर्विद्या स्पर्धेतील यशापासून ते ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी आर्चरी स्पर्धेत 8व्या क्रमांकार्पयत मजल मारलेल्या अजितची स्पर्धा जिंकण्याची धडपड अजून सुरू आहे.
कर्ज काढून सराव.. दीड लाख रुपयांचे कर्ज घेऊन धनुर्विद्येचे साहित्य घेऊन शेतात सराव केला. जालन्याच्या प्रकाश ढुसेजा मार्गदर्शक बनल्यानंतर मात्र खेळाची व्यवस्थित माहिती होऊ लागली अन् 2क्12ला राज्य संघात निवड झाली. चेन्नई, झारखंड, औरंगाबाद, मुंबई, पतियाला, अमृतसर, चंदीगढ येथील स्पर्धेत सुवर्ण, कांस्य व रौप्यपदके मिळवली.
च्आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी रिकव्र्ह किंवा कम्पाउंड धनुष्य लागते. हे खूप महाग असते, त्यामुळे लाकडी धनुष्याने सराव सुरू ठेवला आहे. याच प्रकारात खेळून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ‘नेम’ साधणार आहे, असे अजित वसेकर म्हणाला.
च्ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याची अजितची क्षमता आहे, मात्र दज्रेदार प्रशिक्षण आणि आर्थिक पाठबळ त्याला हवे आहे, असे जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव हरिदास रणदिवे यांनी सांगितले.
च्घरची परिस्थिती बेताचीच.. वडिलांच्या शेतीव्यवसायाबरोबर टपरीवजा हॉटेल.. शाळेपेक्षा हॉटेलातील कामातच जास्त वेळ जायचा.
8वीला नेवासा येथे सैनिक स्कूलमध्ये ज्युदोची निवड केली. मात्र दुखापतीमुळे तो सोडावा लागला. तेव्हा धनुर्विद्या म्हणजे काय हे माहीतही नव्हते, अभिजित दळवी सर भेटले अन् त्याकडे वळलो. वडिलांच्या अनिच्छेमुळे आणि आर्थिक अडचणीमुळे हा खेळ सोडून पाटकूलला यावे लागले. जिद्द न सोडता नातेवाइकाकडून पैसे जमा करून साहित्य घेऊन शेतातच सराव केल्याचे अजित सांगतो.
च्मोहोळमध्ये या खेळाची माहितीच नव्हती, नेताजी कॉलेजमध्ये शिक्षक सोनवणो यांच्या मदतीने थोडा सराव सुरू केला अन् जिल्हास्तरावरचे पहिले बक्षीस पटकावले, हेच पहिले यश.
च्12वीनंतर अकलूजला कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला, पण तिथेही निराशा पाठ सोडेना. विद्यापीठांतर्गत या खेळाला मान्यता नव्हती. वसतिगृह अधीक्षक गोरे यांच्या प्रोत्साहनाने सराव सुरूच ठेवला. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना विषय समजताच त्यांनी खेळाच्या समावेशाची मागणी लावून धरली. यामुळे पतियाला (पंजाब) येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला, मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. 2क्1क्ला आईचे तर तीन वर्षानी वडिलांचेही निधन झाले आणि तीन भावंडांची जबाबदारी अंगावर आली. शेतीशिवाय पर्याय नव्हता.