२२ ते २६ जून मध्ये राज्यात वादळी पाऊस, त्यानंतर पावसात खंड पडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 08:22 AM2019-06-22T08:22:19+5:302019-06-22T08:22:38+5:30

जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि २६ नंतर पावसात पडणाऱ्या खंडाच्या अंदाजानुसारच पेरणी संबंधी निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Windy rain in the state from 22 to 26 June - Weather Department | २२ ते २६ जून मध्ये राज्यात वादळी पाऊस, त्यानंतर पावसात खंड पडण्याची शक्यता

२२ ते २६ जून मध्ये राज्यात वादळी पाऊस, त्यानंतर पावसात खंड पडण्याची शक्यता

Next

मुंबई - मान्सूनचे आगमन १५ जून रोजी कोकणात झाले असले तरी अद्यापि मान्सून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दाखल झालेला नाही. २२ ते २५ जून दरम्यान बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागात दुपारनंतर वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पावसाची शक्यता आणि प्रमाण कमी राहणार आहे. २६ तारखेनंतर या सर्व भागांमध्ये पावसात परत एकदा खंड आढळून येईल जो किमान आठवडाभर तरी राहणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि २६ नंतर पावसात पडणाऱ्या खंडाच्या अंदाजानुसारच पेरणी संबंधी निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. याचबरोबर, वादळी पावसाच्यादरम्यान लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास पुन्हा सक्रिय झाला असला तरी प्रत्यक्षात पाऊस मात्र बेपत्ताच आहे. दरवर्षी आतापर्यंत मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात होते. परंतु मुंबईत अद्याप म्हणावा तसा पाऊस न झाल्याने मुंबईकरांना उकाड्यालाच सामोरे जावे लागत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. महत्त्वाचे म्हणजे मान्सून राज्यात दाखल झाला असतानाही विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती.

मान्सून तेलंगणा, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये दाखल झाला असून, येत्या काही दिवसांत तो उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात दाखल होईल. नवी दिल्लीत मात्र मान्सून जुलै महिन्यात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात गुरुवारी दाखल झालेल्या मान्सूनचा प्रवास शुक्रवारी मात्र रेंगाळला

Web Title: Windy rain in the state from 22 to 26 June - Weather Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.