राज्यात गुलाबी थंडीची चाहूल; महाबळेश्वर १४.८ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 10:31 AM2021-10-22T10:31:55+5:302021-10-22T10:34:07+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात ऑक्टोबर हीटने घाम फोडलेला असतानाच दुसरीकडे राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.

winter soon to start in state Mahabaleshwar records 14 8 degree temperature | राज्यात गुलाबी थंडीची चाहूल; महाबळेश्वर १४.८ अंशांवर

राज्यात गुलाबी थंडीची चाहूल; महाबळेश्वर १४.८ अंशांवर

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात ऑक्टोबर हीटने घाम फोडलेला असतानाच दुसरीकडे राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. बहुतांश जिल्ह्यातील विशेषतः पुण्याचे किमान तापमान सोळा अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले असून, दिवाळीच्या आसपास आणखी कमी होणार आहे. महाबळेश्वर राज्यातील सर्वाधिक थंड पर्यटन स्थळ बनले असून तेथे तापमान १४.८ अंश सेल्शियस इतके आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर, पाषाण, राजगुरुनगर, तळेगावसह जवळच्या परिसरातील किमान तापमान १६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून १६ ते १८ अंशाच्या आसपास आहे. दिवसा उन्हाचा तडाखा बसत असला तरी रात्रीच्या वातावरणातील गारवा नागरिकांना दिलासा देत आहे. सायंकाळनंतर गार वारे वाहत असून, यात भर पडणार आहे.

हवामानात असा असेल बदल
राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात येत आहे.
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरी नोंदविण्यात आले आहे.

२२ ऑक्टो. : कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे राहील.
२३ ऑक्टो. : कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.
२४-२५ ऑक्टो. : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.

प्रमुख शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअस
मुंबई २४.५, पुणे १७, जळगाव १७.६, महाबळेश्वर १४.८, नाशिक १६.१, सातारा १८.५, सोलापूर १७.४, औरंगाबाद १६.२, परभणी १८.९ नांदेड १८, अमरावती १६.८, बुलडाणा १८, नागपूर १७.७

Web Title: winter soon to start in state Mahabaleshwar records 14 8 degree temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.