विदर्भात थंडीची लाट
By admin | Published: January 24, 2016 02:42 AM2016-01-24T02:42:11+5:302016-01-24T02:42:11+5:30
राज्यात शीतलहर कायम असून, उन्हाळ्यात अंगाची काहिली होणाऱ्या नागपूरमध्ये शनिवारी सर्वांत कमी ५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात काही ठिकाणी तीव्र थंडीची लाट
मुंबई/पुणे : राज्यात शीतलहर कायम असून, उन्हाळ्यात अंगाची काहिली होणाऱ्या नागपूरमध्ये शनिवारी सर्वांत कमी ५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात काही ठिकाणी तीव्र थंडीची लाट आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये हिमवर्षाव सुरू आहे. शीत वारे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे थेट दक्षिणेकडे वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे.
पुढील २४ तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्र तर ४८ तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. वर्धा, नागपूर, गोंदियात किमान तापमानात सरासरीच्या ८ अंशांनी घट झाली. मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या ५ ते ८ तर मध्य महाराष्ट्रात तापमानात २ ते ५ अंशांनी घट झाली. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान १० अंशाच्या खाली गेले आहे.
किमान तापमान
नागपूर ५.१, गोंदिया ५.५, नाशिक ७, वर्धा ७.४, नांदेड ७.५, जळगाव ८.२, अहमदनगर ८.४, मालेगाव ८.४, पुणे ९, परभणी ९.१, चंद्रपूर ९.२, अमरावती ९.४, अकोला ९.५, औरंगाबाद १०, महाबळेश्वर ११.५, सातारा १२.४, बुलढाणा ११.२
(अंश सेल्सिअसमध्ये)