विदर्भात थंडीची लाट
By admin | Published: December 22, 2016 02:20 AM2016-12-22T02:20:49+5:302016-12-22T02:20:49+5:30
ओडिशा, छत्तीसगड आणि विदर्भात थंडीची लाट आली असून पूर्व मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी
पुणे : ओडिशा, छत्तीसगड आणि विदर्भात थंडीची लाट आली असून पूर्व मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे़ कोकण, गोव्यातील काही भागात व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे़ राज्यात सर्वांत कमी तापमान गोंदिया येथे ७़८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ देशात अमृतसर, भिलवाडा येथे सर्वांत कमी ५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले़
पुण्यात गुरुवारी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून, किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे़ गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़
राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान
पुणे ९़९, जळगाव ९,कोल्हापूर १४़९, महाबळेश्वर १३, मालेगाव ९़८, नाशिक ९़६, सांगली ११़८, सातारा ११़८, सोलापूर ११़५, मुंबई २२, अलिबाग १८़४, रत्नागिरी १९़६, पणजी २०़४, डहाणू १८, भिरा १९, उस्मानाबाद १०, औरंगाबाद १०, परभणी ९़५, नांदेड १२, अकोला १०़५, अमरावती ९, बुलडाणा १२़८, ब्रह्मपुरी १०़९, चंद्रपूर ९़८, गोंदिया ७़८, नागपूर९़२, वाशिम १८, वर्धा १० व यवतमाळ १०़४़
(अंश सेल्सिअस)