महागाई भत्त्याची रक्कम रोखीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2016 01:49 AM2016-10-22T01:49:04+5:302016-10-22T01:49:04+5:30
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीक कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने देण्याचा निर्णय वित्तमंत्री
मुंबई : राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीक कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने देण्याचा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला असून, तसे आदेशही काढले आहेत.
१ जानेवारी २०१६पासून सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ११९ टक्क्यांवरून १२५ टक्के करण्यात आला आहे. तसेच १ सप्टेंबर २०१६पासून सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्यात आली आहे. दिनांक २० आॅक्टोबर २०१६च्या निर्णयानुसार दिनांक १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्याच्या विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे पुढे लागू राहणार असून, सुधारित वेतन संरचनेत वेतन अनुज्ञेय असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहणार आहे. कालच आॅक्टोबरचे वेतन २५ आॅक्टोबरला देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. (प्रतिनिधी)