पंधरा दिवसात विठ्ठलाकडे दोन कोटी २९ लाखाची श्रीमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2016 06:52 PM2016-07-25T18:52:31+5:302016-07-25T19:43:12+5:30
आषाढी यात्रेच्या पंधरा दिवसामध्ये विठ्ठल मंदिर समितील देणगीरुपाने तब्बल दोन कोटी २९ लाख ४१ हजार ६ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न ७ लाख ५३ हजार रुपयाने जास्त आहे
Next
दीपक होमकर
पंढरपूर, दि. २५ : आषाढी यात्रेच्या पंधरा दिवसामध्ये विठ्ठल मंदिर समितील देणगीरुपाने तब्बल दोन कोटी २९ लाख ४१ हजार ६ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न ७ लाख ५३ हजार रुपयाने जास्त आहे.
विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पायावर, पावती व्दारे, बुंदी व राजगिरा लाडू, भक्तनिवास अशा सर्व उत्पन्नाच्या सोर्स मध्ये यंदा गतवर्षीच्या तुलनेत रकमेची वाढ झाली आहे. मंदिरातील हुंडी पेट्यातील पैस्यांची मोजणी अद्याप होणे बाकी असल्याने ती रक्कमही ५०- ६० लाखात जाईल व एकूण उत्पन्न तीन कोटींच्या घरात जाईल अशी अपेक्षा व्यक्त होतेय.