अवघ्या वर्षभरातच अभिषेक कृष्णा यांची पुण्यातून नाशिकला बदली

By admin | Published: July 7, 2016 05:37 PM2016-07-07T17:37:15+5:302016-07-07T17:41:12+5:30

मागील वर्षी जून 2015 मध्ये पीएमपीचा कारभार स्विकारणारे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली

Within a year, Abhishek changed the name of Krishna from Pune to Nashik | अवघ्या वर्षभरातच अभिषेक कृष्णा यांची पुण्यातून नाशिकला बदली

अवघ्या वर्षभरातच अभिषेक कृष्णा यांची पुण्यातून नाशिकला बदली

Next
>ऑनलाइन लोकमत
 पुणे : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जीवन वाहीनी असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)ची स्थिती दिवसें दिवस खराब होत असतानाच; या स्थिती सुधारण्यासाठी पूर्ण वेळ अधिकारीच मिळत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मागील वर्षी जून 2015 मध्ये पीएमपीचा कारभार स्विकारणारे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमपीचा कारभार  पुन्हा एकदा उघड़यावर पडला असून या संस्थेसाठी पूर्ण वेळ अधिकारी देण्यास राज्यशासनाचीच मानसिकता नसल्याची टिका केली जात आहे. या संस्थेला तोटयाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी होत असतानाच; गेल्या दोन वर्षात तीन अधिकारी नेमले असून त्यांची बदलीही करण़्यात आली आहे. 
    2014 पर्यंत तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक  सतीश जोशी यांनी आपला कार्यकाल पूर्ण केल्यानंतर राज्यशासनाने तत्कालीन मुद्रांक शुल्क आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची 14 डिसेंबर 2014 ला पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर  5 मार्च 2015  डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली पंतप्रधान कार्यालयात झाल्यानंतर पीएमपीची धुरा मार्च 2015 ते जून 2015 या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी महापालिकेचे तत्कालीन  अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यनंतर पुन्हा राज्यशासनाने पुणे महापालिकेत सहा महिने अतिरिक्त आयुक्त राहिलेले अभिषेक कृष्णा यांच्याकडे जून 2015 पासून पीएमपीचा पदभार दिला होता. मात्र, त्यांचा 11 महिन्यांचा कालावधी झाला असतानाच आता कृष्णा यांची बदली नाशिकच्या महापालिका आयुक्तपदी करण़्यात आली आहे या अकरा महिन्यांच्या कालावधीत  पीएमपीच्या प्रशासकीय कामकाजात सुसुत्रता, अधिकाधिक पेपरलेस कारभार, सर्व बसेसला   जीपीएस,पीएमपीच्या संकेतस्थळाचे नुतनीकरण ,अत्याधुनिक  तक्रार निवारण प्रणाली, सुमारे 500  बस खरेदीचा निर्णय झाली. 3 हजार हून अधिक पद भरतीचा निर्णय असे विविध निर्णय घेतले असून या वर्षभराच्या कालावधीत खूप काही शिकायला मिळाले असल्याचे प्रतिकिया कृष्णा यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. तसेच पीएमपीचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी संपूर्ण यंत्रणेच्या अत्याधुनिकरणाची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. 

Web Title: Within a year, Abhishek changed the name of Krishna from Pune to Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.