आरएसएसच्या वर्षभरात चार हजार नव्या शाखा

By admin | Published: October 23, 2014 03:55 AM2014-10-23T03:55:49+5:302014-10-23T03:55:49+5:30

देशभरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कामाला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असून, सध्या देशभरात ६३ हजार ८७६ केंद्राच्या माध्यमातून संघाचे नियमित काम सुरू आहे

Within the year of RSS, four thousand new branches | आरएसएसच्या वर्षभरात चार हजार नव्या शाखा

आरएसएसच्या वर्षभरात चार हजार नव्या शाखा

Next

अनिकेत घमंडी, डोंबिवली
देशभरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कामाला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असून, सध्या देशभरात ६३ हजार ८७६ केंद्राच्या माध्यमातून संघाचे नियमित काम सुरू आहे. गेल्या वर्षभरात सुमारे ४००० शाखा, १५०० संघ मंडळी आणि २००० साप्ताहिक मीलने नव्याने सुरू झाली आहेत. यावर्षीच्या गुरुपूजन उत्सवाला २३ लााख ५३ हजार ३४४ स्वयंसेवक उपस्थित होते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ लाख नवीन स्वयंसेवक या उत्सवांमध्ये सहभागी झाले होते़, अशी माहिती संघाचे अखिल भारतीय कार्यकारीणी सदस्य भिकूजी इदाते यांनी ‘लोकमत’ला दिली़ देशभरात संघामार्फत दीड लाख ‘सेवाकार्ये’ सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले़ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक नुकतीच लखनौ येथे पार पडली़
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह सुरेश (भैय्याजी) जोशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस संघाचे अखिल भारतीय स्तरावरील सुमारे ३९० प्रतिनिधी उपस्थित होते. परिवारातील प्रमुख संस्थांचे मान्यवर प्रतिनिधी देखील या बैठकीस उपस्थित होते. संघ कामाच्या विकासाचा विचार करणे आणि राष्ट्रीय महत्वाच्या विषयांवर चर्चा करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता, असे त्यांनी सांगितले़ यावर्षी विजयादशमी संचलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Within the year of RSS, four thousand new branches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.