तपशिलाशिवाय इमानला डिस्चार्ज नाही
By admin | Published: May 1, 2017 04:47 AM2017-05-01T04:47:30+5:302017-05-01T04:47:30+5:30
अबुधाबी येथील रुग्णालयात इमानवर कोणते उपचार करण्यात येणार आहेत, त्याची प्रक्रिया कशी असेल, ती किती टप्प्यांत करण्यात येईल,
मुंबई : अबुधाबी येथील रुग्णालयात इमानवर कोणते उपचार करण्यात येणार आहेत, त्याची प्रक्रिया कशी असेल, ती किती टप्प्यांत करण्यात येईल, असा वेगवेगळ्या प्रकारचा तपशील मिळाल्याशिवाय इजिप्तच्या इमान अहमदला सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार नाही, असे सैफी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले.
शनिवारी अबुधाबीच्या ‘व्हीपीएस हेल्थकेअर’च्या एअर अॅम्ब्युलन्स टीमने इमानची भेट घेतली. त्या वेळी इमानच्या प्रवासाकरिता विशेष तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी टीमने इमानची भेट घेतली. इमानच्या उपचाराविषयी संपूर्ण तपशील असणाऱ्या जवळपास १० हजार पानांची फाइल तयार करण्यात येत असून त्यावर अबुधाबीच्या रुग्णालय प्रशासनाची स्वाक्षरी घेण्यात येईल, अशी माहिती सैफी रुग्णालयाच्या डॉ. अपर्णा भास्कर यांनी दिली. इमानला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे. इमान आता अबुधाबीला जाणार असल्याने तिची काळजी घेणाऱ्या परिचारिका भावूक झाल्या आहेत. इमानच्या डिस्चार्जविषयी तिची बहीण शायमा हिला विचारले असता डिस्चार्जविषयी डॉक्टरांनी माहिती दिली नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)