जीवघेण्या अपघातात सर्वाधिक प्रमाण विनाहेल्मेटचे ; ५ हजार २५२ दुचाकीस्वारांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 01:51 PM2019-08-02T13:51:40+5:302019-08-02T13:53:09+5:30
हेल्मेट न वापरणे, अतिवेगाने वाहन चालविणे आणि सिटबेल्टचा वापर न करणे, अशा तीन प्रमुख कारणे प्राणघातक अपघाताचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले़.
- विवेक भुसे-
पुणे : महाराष्ट्रातील प्राणघातक अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून २०१८ मध्ये रस्त्यावरील अपघातात १३ हजार २६१ जणांचा मृत्यु झाला़. त्यात हेल्मेट परिधान न केलेल्या ५ हजार २५२ जणांचा समावेश असून हे प्रमाण ३९ ़६ टक्के इतके प्रचंड आहे़. त्याखालोखाल ओव्हर स्पिडिंग (अतिवेग)मुळे ३ हजार ९२६ जणांना (२९़६ टक्के) आपले प्राण गमवावे लागले आहेत़.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी (दि. ३१) मुंबईत झाली़. या बैठकीत ही माहिती देण्यात आली़. देशातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी बुधवारी संसदेने मोटार वाहन कायद्यातील तरतुदीत दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर केले़. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत राज्यातील वाढत्या अपघाताबाबत चर्चा करण्यात आली़.
राज्यात २०१८ मध्ये २० हजार ३३५ जण विविध अपघातात गंभीर जखमी झाले तर, ११ हजार ३० किरकोळ जखमी झाले होते़. त्यात दुचाकीस्वार व सहप्रवाशांची संख्या मोठी आहे़. हेल्मेट परिधान न करणारे ६ हजार ४२० (३१़६ टक्के) गंभीर जखमी झाले होते तर, ३ हजार ५५१ (३२़१ टक्के) किरकोळ जखमी झाले होते़. अतिवेगामुळे ५ हजार ६२३ (२७़७टक्के)गंभीर जखमी झाले असून ३ हजार ६० (२८ टक्के) किरकोळ जखमी झाले होते़.
मोटारीच्या अपघातात प्रामुख्याने सिटबेल्टचा वापर न केल्याने १ हजार ६५६ (१२़५ टक्के) आपले प्राण गमवावे लागले होते़. तसेच २ हजार ९२१ (१४़३ टक्के) गंभीर जखमी तर १ हजार ७१३ जण (१५़५ टक्के) किरकोळ जखमी झाले होते़.
हेल्मेट न वापरणे, अतिवेगाने वाहन चालविणे आणि सिटबेल्टचा वापर न करणे, अशा तीन प्रमुख कारणे प्राणघातक अपघाताचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले़. रॉग साईटने येणाºयामुळे ३८४ (३टक्के) जणांच्या प्राणावर बेतले असून वाहन चालविताना मोबाईलवर बोलण्याने झालेल्या अपघातात ५५ (०़४ टक्के) जणांनी प्राण गमावले़ दारू पिऊन गाडी चालविणाºया ४२ जणांना (०़३ टक्के) मृत्युने गाठले होते़ लाल दिवा ओलंडल्याने अपघात होऊन १६ जणांचा मृत्यु झाला़.
......
पुणे शहरात जानेवारी ते जुलै अखेर झालेल्या अपघातात हेल्मेट परिधान न केलेल्या ४७ जणांना अपघाती मृत्यु झाला आहे़ त्यात ३६ जण चालक होते तर ११ जण सहप्रवासी होते़ तर, हेल्मेटधारक ६ जण मृत्युमुखी पडले आहेत़ तसेच विना हेल्मेट १३४ गंभीर जखमी झाले आहेत. त्यात ९९ वाहनचालक असून ३ सहप्रवासी आहेत़. हेल्मेटधारक तिघे गंभीर जखमी झाले आहेत़. जुलै अखेर प्राणघातक अपघातात ५९ जणांचा मृत्यु झाला़. अतिवेगामुळे झालेल्या अपघातात ५३ जणांचा मृत्यु झाला असून ११५ जण गंभीर जखमी झाले आहेत़.
.....
राज्यातील व पुण्यातील प्राणघातक व गंभीर अपघात पाहिले तर विना हेल्मेट असलेल्यांची संख्या भयंकर आहे़. हेल्मेट विना असलेल्यांची गंभीर जखमी असलेल्यांची संख्या अधिक आहे़. हेल्मेट असलेले इतके गंभीर जखमी नाहीत हे महत्वाचे आहे़ डॉ़ के़ व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे