कामे न करताच ‘स्मार्ट’ बनवाबनवी

By admin | Published: June 28, 2016 12:42 AM2016-06-28T00:42:39+5:302016-06-28T00:42:39+5:30

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या १४ प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटने बटन दाबून मोठया जल्लोषात शुभारंभ करण्यात आला

Without smart work, 'Smart' | कामे न करताच ‘स्मार्ट’ बनवाबनवी

कामे न करताच ‘स्मार्ट’ बनवाबनवी

Next


पुणे : शहरामध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या १४ प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटने बटन दाबून मोठया जल्लोषात शुभारंभ करण्यात आला. देशभर हा लाइव्ह कार्यक्रम दाखविण्यात आला, प्रत्यक्षात त्यापैकी अनेक प्रकल्पांच्या कामाचा अजून पत्ताच नसतानाच केवळ उद्घाटनाचा बार उडवून देण्यात आल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये स्पष्ट झाले आहे.
पंतप्रधानमंत्र्यांचा कार्यक्रमाचा गाजावाजा करण्यासाठीच एकाच वेळी १४ प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत औंध-बाणेर-बोलवाडी भागाची मॉडेल एरिया म्हणून निवड करण्यात आली आहे. या भागातील ३ प्रमुख प्रकल्पांचे मोदी यांनी उद्घाटन केले. त्यामध्ये बाबासाहेब आंबडेकर वसाहतीचे पुर्नवसनाच्या कामाचा शुभारंभही करण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष तेथील कामास सुरूवात होणे अपेक्षित होते. एसआरए अंतर्गत त्या कुटुंबियांचे पुर्नवसन केले जाणार असल्याचे योजनेत स्पष्ट करण्यात आले होते. मात्र एसआरए योजना राबविण्यापूर्वी तेथील नागरिकांची ७५ टक्के मान्यता घेणे आवश्यक आहे. नागरिकांचा विरोध असतानाही या प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे. त्याठिकाणी समाजकल्याण सभागृह, अंगणवाडी उभारण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे, पण उद्घाटन झाले आता काम कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. पादचारी मार्ग व सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहे. त्याचाही पत्ता नाही.
पीमएपी प्रवाशांसाठी मोबिलीटी कार्ड उपलब्ध करून देण्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रत्यक्षात हे कार्ड कधी मिळणार याची चौकशी केली असता मोबिलीटी कार्ड छापून तयार आहेत मात्र पीएमपीच्या संबंधित काम बघणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली झाल्याने नागरिकांना
मिळण्यास उशीर होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बसचे वेळापत्रक सांगणारे मोबाइल अ‍ॅप मिळण्यासही अद्याप बराच कालावधी लागणार आहे.
माहिती घेऊन सांगतो
स्मार्ट सिटी प्रकल्पाचे समन्वय अनिल पवार यांच्याकडे याबाबत उद्घाटन झालेली अनेक कामे कधी सुरू होणार आहेत याची चौकशी केली असता त्यांनी बाहेरगावी असून माहिती घेऊन सांगतो असे उत्तर दिले.
तरूणांना रोजगारप्रशिक्षण देण्यासाठी औंध क्षेत्रिय कार्यालयात लाइट हाऊस उभारले आहे, चौकशी केली असता याअंतर्गत नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे काम यापुर्वीच सुरू केले आहे असे नागरवस्ती विभागाचे अधिकारी गणेश सोनुने यांनी सांगितले.

Web Title: Without smart work, 'Smart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.