सरकारी साक्षीदाराची साक्ष पूर्ण

By admin | Published: July 5, 2017 05:20 AM2017-07-05T05:20:36+5:302017-07-05T05:20:36+5:30

शीना बोरा हत्याप्रकरणात पहिल्या सरकारी साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. पहिले साक्षीदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने

Witnessing the witness of the witness | सरकारी साक्षीदाराची साक्ष पूर्ण

सरकारी साक्षीदाराची साक्ष पूर्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणात पहिल्या सरकारी साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. पहिले साक्षीदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने आपण या प्रकरणी तपास केल्यानंतरच, शीना बोरा हत्येचा कट इंद्राणी, संजीव खन्ना आणि रायने केल्याचा निष्कर्ष काढत, गुन्हा नोंदविल्याचे न्यायालयाने सांगितले.
शीना बोरा हत्येप्रकरणातील पहिले साक्षीदार म्हणून, पोलीस उपनिरीक्षक गणेश दळवी यांची साक्ष नोंदविण्याचे काम मंगळवारी पूर्ण झाले. त्यानंतर, इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना व पीटर मुखर्जीच्या वकिलांनी दळवी यांची उलटतपासणी घेणे अपेक्षित होते. मात्र, ही उलटतपासणी श्यामवर रायची साक्ष नोंदविल्यानंतरच घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती बचावपक्षाच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला केली. त्यावर विशेष न्यायालयाने सीबीआयला १७ जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले.
दळवी यांनी न्यायालयात नोंदविलेल्या साक्षीनुसार, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी राय पोलिसांच्या कोठडीत होता. याबाबत चौकशी करत असताना, शीना बोरा हत्येचा छडा लागला आणि तपासाअंती इंद्राणी, संजीव खन्ना आणि श्यामवर राय यांच्याविरुद्ध दळवी यांनी गुन्हा नोंदविला. दळवी यांनी न्यायालयाला दाखविलेले कागदपत्र, एफआयआर नसल्याचा दावा बचावपक्षाचे वकील सुदीप पासबोला यांनी केला होता. त्यामुळे त्यांचा सीआरपीसी कलम १६२ अंतर्गत जबाब नोंदविण्यात आला, असे पासबोला यांनी सांगितले.

खासगीत बोलण्याची परवानगी मान्य

दळवी यांनी एफआयआर करण्यापूर्वी तपास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांचा सीआरपीसी कलम १६२ अंतर्गत जबाब नोंदविण्यात आला, असे पासबोला यांनी न्यायालयाला सांगितले. दरम्यान, पीटरची इंद्राणीशी
१५ मिनिटे खासगीत बोलण्याची परवानगी न्यायालयाने मान्य केली.

Web Title: Witnessing the witness of the witness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.