हा प्रयोग महिला डब्यावर का?
By admin | Published: March 16, 2015 03:42 AM2015-03-16T03:42:16+5:302015-03-16T03:42:16+5:30
गर्दीच्या वेळी लोकल पकडण्यासाठी होणारी धावाधाव, लोकलच्या दरवाजामधून आत शिरण्यासाठी चाललेली धडपड आणि त्याचवेळी डब्यात उभे राहण्यासाठी
पूजा दामले, मुंबई
गर्दीच्या वेळी लोकल पकडण्यासाठी होणारी धावाधाव, लोकलच्या दरवाजामधून आत शिरण्यासाठी चाललेली धडपड आणि त्याचवेळी डब्यात उभे राहण्यासाठी न मिळणारी जागा पाहता लोकलच्या दरवाजाजवळ लटकून होणारा प्रवास. मुंबईच्या उपनगरापर्यंत पसरलेल्या लोकलमध्ये हे चित्र नित्याचेच आहे. मात्र हेच चित्र गर्दीच्या वेळी पालटणार आहे.
लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने स्वयंचलित दरवाजांची पहिली लोकल सेवेत आणली आणि या दरवाजाचा पहिला प्रयोग फर्स्ट क्लास महिला डब्यावर केला गेला. महत्त्वाची बाब म्हणजे रविवारी ही लोकल सेवेत आल्यावर लोकमत प्रतिनिधीने प्रवास करून त्याची माहिती घेतली आणि यामध्ये महिला प्रवाशांना सुरुवातीला अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले. रविवार, १५ मार्च रोजी प्रायोगिक तत्त्वावर चर्चगेट ते बोरीवली व बोरीवली ते चर्चगेट अशी चालवण्यात आली.