चिपळूणमध्ये महिलेची आत्महत्या; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Published: October 17, 2016 10:05 PM2016-10-17T22:05:26+5:302016-10-17T22:05:26+5:30

येथील नगरपरिषदेतील आरोग्यसेविकेने रविवारी रात्री गांधारेश्वर पुलाखाली आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ११ वाजता पेठमाप वाशिष्ठी नदीकिनारी तिचा मृतदेह आढळला.

Woman committed suicide in Chiplun; Husband's suicide attempt | चिपळूणमध्ये महिलेची आत्महत्या; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

चिपळूणमध्ये महिलेची आत्महत्या; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
चिपळूण, दि. १७ : येथील नगरपरिषदेतील आरोग्यसेविकेने रविवारी रात्री गांधारेश्वर पुलाखाली आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ११ वाजता पेठमाप वाशिष्ठी नदीकिनारी तिचा मृतदेह आढळला. तिचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर दु:खी झालेल्या तिच्या पतीनेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

बळीराम पाणिंद्रे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली. मानसी मंगेश रेपाळ (३८) ही नगर परिषदेत एनआरएचएमअंतर्गत आरोग्यसेविका म्हणून कार्यरत होती. ती मूळची गुहागर तालुक्यातील गिमवी गावची रहिवासी होती. सहा वर्षांपूर्वी मंगेश रेपाळ यांच्याशी तिचा विवाह झाला होता. तिला मूल नव्हते. सध्या ती चिपळूण नगर परिषदेत कार्यरत असल्याने वडनाका येथील महिला मंडळाच्या वसतिगृहात राहात होती.

मामाकडे जाते, असे सांगून रविवारी सायंकाळी वसतिगृहातून बाहेर पडली, ती परत आलीच नाही. शनिवारी ती कामावर आली होती. नेहमीप्रमाणे ती सकाळी ९.३० वाजता कामावर येत असे. आज ती कामावर आली नाही, त्यामुळे चौकशी सुरु झाली. तिच्या नातेवाईकांनीही शोधाशोध सुरु केली होती. त्यातून गांधारेश्वर पुलाजवळ तिची दुचाकी आढळून आली. दरम्यान, अधिक शोध घेतला असता मृतदेहाची ओळखही पटली. त्यामुळे तिचे निधन झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. एस. नाटेकर यांनी भेट दिली.

याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पत्नीने आत्महत्या केल्याचे कळल्यानंतर तिचा पती मंगेश यानेही विष प्रशान करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्याला लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Web Title: Woman committed suicide in Chiplun; Husband's suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.