कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून महिलेने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 05:11 PM2021-03-07T17:11:51+5:302021-03-07T18:17:06+5:30
CoronaVirus मंगला प्रल्हाद धर्माळी (४५) असे या महिलेचे नाव असून, त्यांनी शनिवारी त्यांच्या शेतातील तळ्यात आत्महत्या केल्याचे रविवारी समोर आले.
घारोड (खामगाव): कोरोना विषाणू संसर्ग चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर केवळ भीतीपोटी खामगाव तालुक्यातील निरोड या गावातील एका महिलेने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मंगला प्रल्हाद धर्माळी (४५) असे या महिलेचे नाव असून, त्यांनी शनिवारी त्यांच्या शेतातील तळ्यात आत्महत्या केल्याचे रविवारी समोर आले. निरोड या गावात आरोग्य विभागाच्यावतीने कोरोना चाचणी शिबिर पार पडले. यामध्ये गावातील पाच ते सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये मंगला प्रल्हाद धर्माळी यांचा चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला. ही बाब समजताच घाबरलेल्या मंगला धर्माळी यांनी त्यांच्या शेतातील तळ्यात उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुल व बराच परिवार आहे. पुढील तपास हिवरखेड पोलिस स्टेशनचे रतन जंवजाळ करीत आहेत.