प्रसाधनगृहात पाय अडकलेल्या महिलेची सुटका

By Admin | Published: December 12, 2015 02:17 AM2015-12-12T02:17:28+5:302015-12-12T02:17:28+5:30

कोकणकन्या एक्स्प्रेसच्या प्रसाधनगृहात पाय अडकलेल्या महिलेची आठ तासांनंतर सुटका करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले.

The woman who was trapped in the toilet has been released | प्रसाधनगृहात पाय अडकलेल्या महिलेची सुटका

प्रसाधनगृहात पाय अडकलेल्या महिलेची सुटका

googlenewsNext

रत्नागिरी : कोकणकन्या एक्स्प्रेसच्या प्रसाधनगृहात पाय अडकलेल्या महिलेची आठ तासांनंतर सुटका करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. रुबियाबी शेख (६८, घाटकोपर, मुंबई) असे त्यांचे नाव असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुबियाबी शेख या ठाणे ते करमाळी असा प्रवास करीत होत्या. खेडमध्ये रेल्वे आल्यानंतर प्रसाधनगृहात गेल्यानंतर शेख पाय घसरून पडून त्यांचा पाय अडकला होता. प्रशासनाने मदतीसाठी चक्रे हलवली. सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान रेल्वे रत्नागिरीत आली. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे कर्मचारी व रत्नागिरी नगर परिषद अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले, मात्र शेख यांचा पाय सुजल्याने पत्र्याच्या पाइपमध्ये तो अधिकच घट्ट बसला होता. त्यामुळे पाइपच्या आत मेटल प्लेट टाकून नंतर कटरच्या साहाय्याने पत्रा कापण्यात आला.

Web Title: The woman who was trapped in the toilet has been released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.