महिला अत्याचारात साक्षीदारांची वानवा

By admin | Published: August 6, 2014 11:36 PM2014-08-06T23:36:52+5:302014-08-06T23:36:52+5:30

न्यायालयात गुन्हा शाबीत करण्यासाठी साक्षीदारच पुढे येत नाहीत. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये साक्षीदार हे खूप मोठे आव्हान आहे.

Woman witnesses testimony against women | महिला अत्याचारात साक्षीदारांची वानवा

महिला अत्याचारात साक्षीदारांची वानवा

Next
>पुणो : महिलांवरील अत्याचाराच्या प्रसंगात तक्रार नोंदवली जाते, पोलीसही जीव ओतून तपास पूर्ण करतात; मात्र न्यायालयात गुन्हा शाबीत करण्यासाठी साक्षीदारच पुढे येत नाहीत. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये साक्षीदार हे खूप मोठे आव्हान आहे. नागरिक महिलांविषयक चर्चासत्रे, प्रशिक्षिण शिबिरांमध्ये हिरिरीने सहभागी होतात; मात्र न्यायालयात साक्ष देण्याची वेळ आली, की माघार घेतात. ही खूप मोठी शोकांतिका आहे, असे मत राज्य तरुंग विभागाच्या अतिरिक्त महासंचालक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केले.
निमित्त होते ‘महिलांसाठी सुरक्षित पुणो’ या माहिती पुस्तिकेच्या प्रकाशनाचे. जनवाणी, पुणो पोलीस महिला कक्ष व सिम्बायोसिस लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ही माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. बुधवारी या पुस्तकाचे बोरवणकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेडचे चेअरमन अरुण फिरोदिया, कमिन्स इंडिया लिमिटेडचे संचालक प्रदीप भार्गव, सिम्बायोसिस लॉ कॉलेजच्या संचालिका शशिकला गुरपूर, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष एस. के. जैन उपस्थित होते.
बोरवणकर म्हणाल्या, ‘‘अनेकदा महिलेची तक्रार ही खरी असते. त्यासाठी पोलीसही मेहनत घेतात. मात्र, साक्षीदारच नसतात. काही वेळा तर स्वत: पीडित महिलाच माघार घेते. हे पोलिसांपुढील खूप मोठे आव्हान आहे. साक्षीदारांनी स्वत:हून पुढे येणो आवश्यक आहे. पोलीस किंवा न्यायव्यवस्थेकडून त्यांना त्रस नक्कीच होणार नसतो, हे समजून घेतले पाहिजे.’’ 
संपूर्ण महाराष्ट्रात पुणो पोलिसांची झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, कामाविषयीची आस्था आणि ‘बैठक’ मारून गुन्ह्याचा छडा लावण्याची पद्धत ही वाखाणली जाते. त्यामुळे पुणो हे शहर महिलांसाठी सुरक्षित आहे.’’
भार्गव म्हणाले, ‘‘निर्भया बलात्कार प्रकरणानंतर सर्व स्तरांतून गुन्हेगाराला पकडण्याची मागणी होत होती. मात्र, गुन्हेगाराला पकडण्यासोबतच गुन्हा रोखण्यासाठी काय करता येईल, यासाठी आपण कटाक्षाने प्रयत्न केले पाहिजेत. महिलांचा अपमान, शिवीगाळ, अमानवी वागणूक, छळ हे गुन्हेही घडणार नाहीत, यासाठी आपण प्रय} करायला हवेत.’’ मोनिका स्वीटी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
 
आजही गावाकडील, दुर्गम भागातील स्त्री ही मुख्य प्रवाहात नाही. याचे मुख्य कारण तिची सुरक्षितता हे आहे. महिलांना जगण्याचा अधिकार मिळाला; पण त्यातही सुरक्षित जगण्याचा हक्क मिळणो आवश्यक आहे. 
- शशिकला गुरपूर, संचालिका, सिम्बायोसिस लॉ कॉलेज

Web Title: Woman witnesses testimony against women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.