इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू

By Admin | Published: June 28, 2016 01:45 AM2016-06-28T01:45:15+5:302016-06-28T01:45:15+5:30

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून विमल सतिश बिराजदार (वय ३६) या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

Woman's death due to falling from the building | इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू

इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू

googlenewsNext


रहाटणी : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून विमल सतिश बिराजदार (वय ३६) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. तोल जाऊन पडली की आत्महत्या केली हे स्पष्ट झाले नाही.
श्रीराम योगी सोसायटीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या ठिकाणी सकाळी ११ला ही महिला सदनिका पाहण्यासाठी गेली. रखवालदाराला सांगून तिने दुसऱ्या मजल्यावरील सदनिका पाहिली. दुपारी रखवालदार जेवणासाठी घरी गेला. काही मजूर त्या ठिकाणी काम करत होते. इमारतीच्या सातव्या मजल्यावरून महिला खाली ठेवलेल्या सिमेंटच्या ढिगाऱ्यावर पडल्याचे दिसून आले. मोठा आवाज झाला. सिमेंटच्या ढिगाऱ्यावर पहिला टप्पा पडून दुसऱ्या टप्यात पार्कींगच्या जागेत ती कोसळली. मोठा आवाज झाल्याने मजूरांनी त्या दिशेने धाव घेतली. महिला पडली असल्याचे पाहून जीव वाचविण्याच्या उद्देशाने त्यांनी मदतीसाठी धावाधाव केली. मात्र ती जागीच ठार आल्याचे लक्षात आले.
आरडा ओरडा करताच आजूबाजूचे नागरिक त्या ठिकाणी जमले. मृत्यू झालेल्या महिलेचे घर या इमारतीपासून काही अंतरावरच असल्याने जमलेल्या लोकांना
लगेच तिची ओळख पटली. त्याच परिसरात असलेल्या स्मृती
एन्क्लेव्हमधील तिचे नातेवाईक काही वेळातच घटनास्थळी आले. तिचे
पती तसेच नातेवाईक यांचा आक्रोश सुरू झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले. (वार्ताहर)

Web Title: Woman's death due to falling from the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.