चोराचा पाठलाग करताना कल्याणमध्ये तरूणीचा मृत्यू
By admin | Published: August 1, 2015 12:25 PM2015-08-01T12:25:09+5:302015-08-01T13:04:24+5:30
लोकल प्रवासादरम्यान चोरट्याने पळवलेली बॅग परत मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरूणीचा लोकलची धडक बसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली.
Next
ऑनलाइन लोकमत
कल्याणा, दि. १ - लोकल प्रवासादरम्यान चोरट्याने पळवलेली बॅग परत मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरूणीचा लोकलची धडक बसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली. प्राजक्ता गुप्ते असे त्या दुर्दैवी तरूणीचे नाव असून याप्रकरणी लोहमार्ग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ता नवी मुंबईत एका आयटी कंपनीत काम करत होती. रोज कल्याण ते ठाणे व ठाणे ते नवी मुंबई असा प्रवास करणारी प्राजक्ता गुरूवारी रात्री कल्याणला परत येत असताना तिची गाडी काही काल पत्रीपुलाच्या अलीकडे थांबली. अंधाराचा फायदा घेत एका चोराने दरवाज्याजवळ उभी असलेल्या प्राजक्ताची पर्स हिसकावून पळ काढला. मात्र प्राजक्ताने घाबरून न जाता लोकलमधून उडी मारली आणि त्या चोराचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. दुर्दैवाने मागून येणा-या लोकलची धडक प्राजक्ताला बसली व ती कोसळली. या घटनेत तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी दाखल केला.
मात्र आपल्या मुलीचा मृत्यू लोकलच्या धडकेत झाला नसून कोणीतरी तिला लोकलमधून खाली फेकले असा आरोप प्राजक्ता वडिलांनी केली. तिच्या मृत्यूनंतर एक तरूण माझ्याकडे आला व प्राजक्ताला कोणीतरी खाली ढकलले असे त्याने सांगितले. दोन मुली त्या घटनेच्या साक्षीदार असून आपणही घटनेच्यावेळेस प्राजक्ताच्या मागच्याच डब्यात असल्याने आपणही तो प्रकार पाहिला, असा दावा त्या मुलाने केला, असे तिचे वडील म्हणाले. त्यामुळे या घटनेबद्दल संशय व्यक्त होत आहे. मात्र एकंदरच आजही रेल्वे प्रवास महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे हे या घटनेवरून पुन्हा सिद्ध झाले आहे.