एनआरआयकडून हुंड्यासाठी पत्नीचा छळ

By admin | Published: March 7, 2017 01:52 AM2017-03-07T01:52:15+5:302017-03-07T01:52:15+5:30

लंडनचा टेक्निशियन असलेल्या एनआरआयने पत्नीकडून ५ लाखांचा हुंडा मागितल्या-प्रकरणी जितेंद्र नेवाल (वय ३६) याला नेहरूनगर पोलिसांनी अटक केली

Woman's persecution for dowry from NRI | एनआरआयकडून हुंड्यासाठी पत्नीचा छळ

एनआरआयकडून हुंड्यासाठी पत्नीचा छळ

Next


मुंबई : लंडनचा टेक्निशियन असलेल्या एनआरआयने पत्नीकडून ५ लाखांचा हुंडा मागितल्या-प्रकरणी जितेंद्र नेवाल (वय ३६) याला नेहरूनगर पोलिसांनी अटक केली आहे.
मूळचा चेंबूरचा रहिवासी असलेला नेवाल हा लंडनमधील एका मल्टिनॅशनल कंपनीत २००७ पासून टेक्निशियन म्हणून काम करतो. त्याचवेळी त्याचा विवाह झाला होता. वर्षातून एक किंवा दोन महिने तो पत्नीसोबत मुंबईत येत असे. २०१३ मध्ये तो पत्नीला मुंबईत सोडून लंडनला निघून गेला. त्यानंतर २०१४ मध्ये तो मुंबईत परत आला असताना पत्नीने त्याला सोबत नेण्याची विनंती केली. तेव्हा नेवालने तिच्याकडून पाच लाखांची मागणी केली. तिने यास नकार दिल्यामुळे तो तिला न घेताच निघून गेला.
काही दिवसांनी नेवालचे अन्य एका महिलेसोबतचे फोटो त्याच्या पत्नीच्या नजरेत पडले. अनैतिक संबंधामुळे नेवाल टाळाटाळ करत असल्याचा संशय तिला आला. मार्च महिन्यात तो घरी आला. तिने याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या हातावर ब्लेडने वार केले. यामध्ये ती जखमी झाली. शेजारच्यांच्या मदतीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिच्या तक्रारीवरून नेहरूनगर पोलिसांनी हुंडा मागितल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Woman's persecution for dowry from NRI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.