नागपुरात महिला वकिलाची हत्या

By admin | Published: April 15, 2017 01:39 AM2017-04-15T01:39:11+5:302017-04-15T01:39:11+5:30

गिट्टीखदानमधील महिला वकिलाची अल्पवयीन आरोपीने चाकूने भोसकून हत्या केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राजश्री ऊर्फ राजेशकुमारी विश्वस्वरूप टंडन (५२) असे

Women advocates murder in Nagpur | नागपुरात महिला वकिलाची हत्या

नागपुरात महिला वकिलाची हत्या

Next

नागपूर : गिट्टीखदानमधील महिला वकिलाची अल्पवयीन आरोपीने चाकूने भोसकून हत्या केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
राजश्री ऊर्फ राजेशकुमारी विश्वस्वरूप टंडन (५२) असे या वकिलाचे नाव आहे. त्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाजवळ मानवसेवानगरात राहत होत्या. शेजारीच राहणाऱ्या आरोपीच्या परिवारासोबत त्यांचा अनेक वर्षांपासून वाद होता. आरोपीच्या आजोबांविरुद्ध कायदेशीर कारवाई करतानाच राजश्री यांनी आपल्या प्रभावाचा गैरवापर करीत आरोपीच्या वडिलांवरही दोन वर्षांपूर्वी हद्दपारीची कारवाई करून घेतली.
येत्या जूनमध्ये हद्दपारीचा अवधी संपणार असल्याने त्या आरोपीच्या परिवारातील इतरांना त्रास देत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री त्या आरोपीच्या घराजवळून जात होत्या. त्याचवेळी आरोपी समोरून येत असल्याचे पाहून राजश्री यांनी त्याला टोमणा मारला. त्यावरून वाद वाढल्यानंतर राजश्रीने आरोपीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने राजश्रीचा पाठलाग करून सपासप चाकूचे वार केले. त्या ठार झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी पळून गेला. (प्रतिनिधी)

आरोपी दहावीचा विद्यार्थी
पोलिसांच्या माहितीनुसार, वकील असूनही राजश्री यांचे वर्तन वादग्रस्त होते. त्यांच्यावर सात गुन्हे दाखल होते. आरोपीचे वय अवघे १५ वर्षे असून, त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. राजश्री यांच्याकडून होणारा त्रास असह्य झाल्यामुळेच आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

Web Title: Women advocates murder in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.