महिला व बाल विकास विभाग अधिकारी करणार काळ्या फिती लावून काम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 08:13 PM2019-08-17T20:13:32+5:302019-08-17T20:14:02+5:30
राज्यभरातील सर्व अधिकारी १९ ते २४ ऑगस्ट या कालावधीत काळ्या फिती बांधून काम करणार आहेत.
पुणे : राज्य शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांना महिला व बाल विकास विभागात प्रतिनियुक्त्या देऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेतील राज्यभरातील सर्व अधिकारी दि.१९ ते २४ ऑगस्ट या कालावधीत काळ्या फिती बांधून दैनंदिन काम करणार आहेत.
राज्य शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांना महिला व बाल विकास विभागामध्ये प्रतिनियुक्ती दिली जात असल्याने या विभागातील अधिकाऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे यापुर्वीच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष राहूल मोरे, सचिव दिलीप हिवराळे, सहसचिव गोविंद इसानकर यांनी महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांना दिले आहे.