महिला व बालविकास विभागाने रोखला बालविवाह

By admin | Published: May 6, 2017 12:50 AM2017-05-06T00:50:09+5:302017-05-06T00:50:09+5:30

कारंजा तालुक्यातील यावर्डी येथील १६ वर्षीय मुलीचा विवाह महिला व बालविकास विभागने रोखला.

Women and Child Development Department prevented child marriage | महिला व बालविकास विभागाने रोखला बालविवाह

महिला व बालविकास विभागाने रोखला बालविवाह

Next

वाशिम : कारंजा तालुक्यातील यावर्डी येथील १६ वर्षीय मुलीचा विवाह महिला व बालविकास विभागने रोखला.
यावर्डी येथील या अल्पवयीन मुलीचा २ मे रोजी जालना येथील युवकाशी विवाह होणार होता. या बालविवाहाची तक्रार १0९८ या चाईल्ड लाइनच्या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त झाल्यानंतर महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाच्या अधिकार्‍यांनी १ मे रोजी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना कायद्याबाबत माहिती दिल्याने २ मे रोजी होणारा विवाह थांबविण्याचा निर्णय मुलीच्या कुटुंबीयांनी घेतला.

Web Title: Women and Child Development Department prevented child marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.